भाजप नेत्याला भिडणारी रणरागिणी… उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज नेमका अचानक कसा झाला बाद?
Ujjwala Thite nomination form rejected: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. पण त्यामागील नेमकी कारणं कोणती ते आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

अनगर(सोलापूर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक अत्यंत अनपेक्षित आणि सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारी घटना घडली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अत्यंत नाट्यमयरित्या अर्ज दाखल केला होता. भाजप नेते राजन पाटील यांच्याविरोधात आघाडी उघडणाऱ्या उज्ज्वला थिटे यांना चक्क पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता.
मात्र, काल (18 नोव्हेंबर) छाननीत थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. ज्यामुळे उज्ज्वला थिटेंना मोठा झटका बसला आहे. कारण आता त्या निवडणुकीच्या रिंगणातच बाहेर पडल्या आहेत.
उज्ज्वला थिटेंचा अर्ज का करण्यात आला बाद?
याबाबत माहिती देताना निवडणूक अधिकारी सचिन मुळीक असं सांगितलं की, थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.










