ऐन वयात येणाऱ्या 16 वर्षांच्या कोमलला तिच्या मामानेच लोकलमधून दिलं ढकलून, नेमकं कारण काय?
Vasai Crime: एका व्यक्तीने तिच्या 16 वर्षीय भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT

वसईः वसई येथून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या स्वतःच्या 16 वर्षीय भाचीला चालत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. मृत भाचीचे नाव कोमल सोनार हत्या करणाऱ्या नराधम मामाला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
कोमल ही तिच्या आईसोबत मानखुर्द येथे राहत होती. 15 नोव्हेंबर 2025 रोजी कोमल अचानक घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी कोमल नालासोपारा येथे तिचा छोटा मामा अर्जून सोनीच्या घरात असल्याची माहिती मिळाली. मात्र तिची मोठी मामी अंजलीला आणण्यासाठी पोहोचल्यावर कोमल पुन्हा गायब झाली असल्याचं तिला सांगण्यात आलं.
हे ही वाचा>> मामाच्या मुलाने 8 वर्षे ठेवले शारीरिक संबंध... नंतर, दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं!
पण हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं कोमलच्या मोठ्या मामीला वाटलं. त्यामुळे तिने तात्काळ वाळीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोठी मामी अंजली सोनी हिने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सुरुवातीला कोमलच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, काही वेळाने कोमलच्या मोबाइलवरून आरोपी मामा अर्जुन सोनी याने फोन करून कोमल आपल्या सोबत असल्याचे घरी सांगितले. ज्यानंतर कोमलच्या आईने अर्जुनला तिला त्वरित घरी आणण्यास सांगितले. परंतु अर्जुनने तसे केले नाही.









