‘शिल्लक सेनेच्या 8 याचिका अन् पोपट मेलाय’, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize uddhav thackeray
devendra fadnavis criticize uddhav thackeray
social share
google news

Devendra fadnavis criticize Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालानंतर राज्याच्या राजकारणात पोपट मेलाय असा शब्दप्रयोग करून भाजप आणि ठाकरे गटामध्ये जुंपली आहे. त्यात आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी तसा शब्दप्रयोग करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचलं आहे. ‘उद्धवजी तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका’, कारण पोपट मेलाय…आणि हे सरकार पुर्णपणे संवैधानिक आहे.सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल आणि निवडून देखील येईल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याचसोबत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील मागण्या देखील वाचून दाखवत निकाल सांगितला. (devendra fadnavis criticize uddhav thackeray shillak sena and parrot death)

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सरकारवर जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, त्यांची तोंड बंद होतील. असे मला वाटलं होते, असे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) म्हणत ठाकरे गटाचा शिल्लक सेना असा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयातील 8 याचिका वाचून दाखवल्या. यातील एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही. आणि ‘उद्धवजी सांगतात, ‘जा गावोगावी आपलाच विजय झालाय”, ”बडवा आपल्या बापाचे काय जातंय”, ”बडवा जाऊन काही हरकत नाही”. ‘पण उद्धवजी तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका’, कारण पोपट मेलाय…, अशा शब्दात त्यांनी टीका केली. तसेच राजा जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आग्रह असतो, त्यावेळी त्याची प्रजा त्याला तसे सांगत असतात. त्यामुळे राजाच्या आवडता पोपट मेला, हे जसे कोणी सांगत नाही, तसे उद्धव ठाकरेंना हे कोणी सांगत नाही, की उद्धवजी पोपट मेलाय, ते असेच सांगतात मेलाय नाही, थोडा बोलत नाही आहे, हसत नाही, डुलत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : शरद पवारांच्या राजीनाम्याची देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले… 

भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे, ती अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचारासाठी सरकार सोडलं, कारण एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते, विचारांकरता सरकार सोड़लं, ते आपल्या सोबत आहेत. आणि ज्यांनी सरकार करता विचार सोडला, खुर्ची करता विचार सोडला, ती शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसेच मला विश्वास आहे शिवसेना भाजप कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका, जिल्हा परिषद लोकसभा विधानसभेत निवडून येऊ शकतो, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हे वाचलं का?

कर्नाटकमध्ये आपला पराभव झाल्याबरोबर काही लोकांना एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, ज्यांच्या घरी पोरगा पैदाच झाला नाही, तेही असे नाचतायत, जणू त्यांनाच पोरगा पैदा झालाय.ज्यांचा एक माणूस निवडून आला नाही ते ही बडवू राहिले, जे उभे राहिले नाही तेही बडवू राहिले, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

हे ही वाचा : शरद पवारांनी भाकरी फिरवली! ‘या’ नेत्यांची होणार उचलबांगडी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT