'वादग्रस्त' कवितेच्या प्रकरणात इम्रान प्रतापगढींना दिलासा, काय होतं प्रकरण? कुणाल कामरालाही...
Imran Pratapgarhi: न्यायमूर्ती अभय एस. ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गुजरातमधील जामनगर येथील इम्रान प्रतापगढ़ी यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इम्रान प्रतापगढी यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
वादग्रस्त कवितेच्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
कुणाल कामराच्या प्रकरणात नेमकं काय होणार?
Imran Pratapgarhi : काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. इम्रान यांच्या कवितेबद्दल गुजरातमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयानं महत्वाची टिपण्णी केली. "कविता, कला आणि व्यंगचित्रं जीवन समृद्ध करतात. समाजासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. पोलिसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी घेतली पाहिजे."
काय होते आरोप?
इम्रान प्रतापगढी हे गुजरातच्या जामनगरमध्ये सामुहिक विवाह सोहळ्यात पोहोचले होते. तिथे फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. याच एन्ट्रीचा व्हिडीओ इम्रान प्रतापगढी यांनी पोस्ट केला होता. मात्र, या व्हिडीओला लावलेल्या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
एफआयआरमध्ये, इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केलेल्या 46 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला जात होता. एक गाणं बॅकग्राऊंड म्युझिकला होतं. ते गाणं आक्षेपार्ह आहे. गाण्याच्या ओळी चिथावणीखोर, राष्ट्रीय एकात्मतेला मारक आणि धार्मिक भावना दुखावणारे आहेत सा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
हे ही वाचा >> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
व्हिडिओ प्रक्षोभक व्हिडीओ असल्याचा आरोप करत यावर आक्षेप घेत गुजरातमधील जामनगरमध्ये इम्रान प्रतापगढ़ी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी 'गुजरात पोलिसांनी दुर्भावनापूर्ण हेतूने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता' असं म्हटलं होतं.










