रेवतीच्या रिसेप्शनमध्ये PM मोदींचा मराठमोळ्या तरुणासोबत खास संवाद, 15 मिनिटं काय चर्चा?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधणारे ‘फणसकिंग’ मिथिलेश देसाई चर्चेत आले आहेत. फणस शेती, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठीच्या त्यांच्या उपक्रमांची जाणून घ्या कहाणी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेवतीच्या रिसेप्शनमध्ये PM मोदींचा मराठमोळ्या तरुणासोबत खास संवाद
15 मिनिटं काय चर्चा?
Jackfruit king mithilesh desai meets Narendra Modi : नवी दिल्लीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले. त्यापैकी पंतप्रधान मोदी एका तरुणाशी संवाद साधत असल्याचा फोटो आणि व्हिडीओ विशेष चर्चेत आहे. मोदींनी ज्या तरुणासोबत संवाद साधला, तो महाराष्ट्रातील युवा शेतकरी आणि ‘फणसकिंग’ आहे. मिथिलेश देसाई असं त्यांचं नाव आहे.
हेही वाचा : गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार, सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
कोण आहेत ‘फणसकिंग’ मिथिलेश देसाई?
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे येथे मिथिलेश देसाई यांची शेती आहे. ते बीटेक अॅग्रीकल्चर इंजिनिअर असून राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांनी भारतात पहिल्यांदा फणसाची कमर्शियल पद्धतीने लागवड केली होती. मिथिलेश देसाई स्वतःच्या 28 एकरांच्या फार्मवर फणसाची लागवड करतात. त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी 1500 एकरांवर शेतकऱ्यांसोबत फणसाच्या लागवडीचे काम करते. फणसासारख्या दुर्लक्षित पिकाला मुख्य पीक म्हणून पुढे आणण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा : ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री
