Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये पडली ठिणगी, कारण ठरले जितेंद्र आव्हाड!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 jitendra awhad controversy ajit pawar mla chhagan bhujbal vs hasan mushrif verbal fight dr babasaheb ambekar poster manusmriti dahan deepak kesarkar
जितेंद्र आव्हाडांवरून अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी
social share
google news

Chhagan Bhujbal vs Hasan Mushrif : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांची पाठराखण केली होती. यानंतर आता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भुजबळ यांनी पाठिंबा देण्याचे केलेले वक्तव्य अत्यंत दुदैवी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांवरून अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. (jitendra awhad controversy ajit pawar mla chhagan bhujbal vs hasan mushrif verbal fight dr babasaheb ambekar poster manusmriti dahan deepak kesarkar.)

ADVERTISEMENT

खरं तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे काही श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीरं केलं होतं. यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक पावित्रा घेत महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले होते. या दरम्यान आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती. यानंतर लगेचच आव्हाडांनी याबाबत माफी देखील मागितली होती. 

हे ही वाचा : "स्मृती इराणी पराभूत होऊ शकतात", कोणता 'फॅक्टर' गेमचेंजर?

जितेंद्र आव्हाडांकडून अनावधनाने झालेल्या या घटनेवर भूजबळांनी त्यांची पाठराखण केली होती. ''जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले होते. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना होती. रागाच्या भरात त्यांनी मनुस्मृती जाळली होती. त्यानंतर त्यांनी न बघताच चित्र फाडलं. आव्हाडानंतर इतर कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं अनुकरण केले. पण यावर त्यांनी माफीही मागितली. पण मुळ मुद्दा जो आहे आम्हाला मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाडचं राहील'',असे विधान करून भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली होती. 

हे वाचलं का?

भुजबळांच्या याच पाठिंब्यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत. आव्हाडांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असे मला वाटत नाही. त्यांना प्रायश्चित घ्यावंच लागेलं'', असे मुश्रीफ म्हणाले. तसेच ''आमच्या भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केलं, हे अत्यंत दुदैवी आहे. त्यांनी त्यांना (आव्हाडांना) खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांनी केलेले कृत्य हे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगण्याची आवश्यकता होती. पण भुजबळांनी जे केलंय अत्यंत दुदैवी असल्याचे मुश्रीफ म्हणाले होते. 

हे ही वाचा : भाजपची उडेल झोप, काँग्रेसचं काय? सट्टा बाजाराचे खळबळ उडवणारे अंदाज

दरम्यान मुश्रीफाच्या त्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले, ते  सिनीअर आहेत त्यांचे ऐकून  घेतले पाहिजे.पण माझं म्हणणं इतकचं आहे. जितेंद्र आव्हाडांवर जी टीका करायची ती करा. परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो. जेव्हा तुम्ही मनुस्मृतीचा विरोध करता, तुम्ही मनुस्मृती जाळता तेव्हा. तसेच  बहुजन समाजाला नको असलेल्या मनुस्मृतीला तुम्ही विरोध केला पाहिजे आणि ती शालेय शिक्षणात येता कामा नये, इतकीच माझी भूमिका असल्याचे भुजबळ म्हणतात. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांवरून अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT