"सुनील तटकरेंचं 'ते' प्रकरण उद्धव ठाकरेंपर्यंत जात होतं", सोमय्यांचा मोठा स्फोट

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुंबई Tak चावडीवर.
social share
google news

Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे खुनशी आणि संकुचित आहेत, असे सांगत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एक प्रसंग सांगितला. यावेळी सोमय्यांनी शरद पवारांचंही कौतुक केलं. 

'मुंबई Tak चावडी' कार्यक्रमात किरीट सोमय्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर त्यांनी काही किस्सेही यावेळी सांगितले.  

गेल्या वर्षभरात तुमचं उद्धव ठाकरे, संजय राऊतांसोबत बोलणं-भेटणं झालंय का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना सोमय्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट 

किरीट सोमय्या म्हणाले, "मला निगेटिव्ह उदाहरण द्यायचं नव्हतं, यासंबंधात. म्हणून मी शरद पवारांचं नाव पॉझिटिव्हली घेतलं होतं. कारण त्यांनी सांगितलं होतं की, किरीट सोमय्याला हात लागता कामा नये. त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं होतं की, त्यांना (किरीट सोमय्या) हात लागला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संपणार. संपणार म्हणजे खूप डॅमेज होणार. म्हणजे लोकांनाही हे आवडणार नाही. वैयक्तिक अफेक्शन काही नाही."

हेही वाचा >> काँग्रेसच्या अजेंड्यावर आरक्षण, कर्जमाफी आणि 25 लाख...; 10 मोठ्या घोषणा

"इथे ना (शिवसेना ठाकरे) नेतृत्वचं खुनशी आणि संकुचित नेतृत्व आहे. किरीट सोमय्यावर वार करा. किरीट सोमय्याला अटक करा. शरद पवार त्याबाबतीत एक मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व आहे. 

ADVERTISEMENT

"मी उद्धव ठाकरेना खूप मदत केलेली आहे. त्यांच्या परिवाराला खूप मदत केलेली आहे. २०१२ ला सुनील तटकरे घोटाळा प्रकरणात... ते जे प्रकरण आहे ना ते तिथपर्यंत (उद्धव ठाकरेंपर्यंत) जात होतं. तो जो त्याचा साला आहे ना, उद्धव ठाकरेंचा... तो त्यावेळी प्रचंड अडचणी आला असता. सगळं नाही सांगत."

ADVERTISEMENT

लग्न पत्रिका आणि किरीट सोमय्यांनी वैर

"२०१६ मध्ये नील सोमय्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी वेळ मागितली. तर त्यांच्या पीएने ज्या भाषेत उत्तर दिलं ना... आणि सूचना अशा होत्या की, नील सोमय्याच्या लग्नात कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याने जायचे नाही. भेटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बोलण्याचा प्रश्नच येत नाही", असं किरीट सोमय्या म्हणाले.  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT