Ladki Bahin Yojana : ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार'', आदिती तटकरेंचं मोठं विधान

मुंबई तक

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सध्या सूरू आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा केले आहेत.

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
ladki bahin yojna aditi tatkare reaction women will get december installement amount ajit pawar eknath shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू

point

पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले

point

डिसेंबरचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सध्या सूरू आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा केले आहेत. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात येणाऱ्या पैशाची प्रतिक्षा लागली  आहे. तर हे पैसे देखील महिलांना डिसेंबरमध्येच मिळणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. (ladki bahin yojna aditi tatkare reaction women will get december installement amount ajit pawar eknath shinde) 

आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्या नेमक्या काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. 

सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती !

हे वाचलं का?

    follow whatsapp