Lok Sabha Election 2024 : मविआला बसणार झटका, महायुतीचं काय होणार? ओपिनियन पोलचा कौल काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 पोलमध्ये महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळेल, असा सर्वे समोर आला आहे. त्यामुळे नेमका पोलमधुन काय कौल वर्तवण्यात आला आहे? हे जाणून घेऊयात.
lok sabha election 2024 zee news matrize opinion poll survey maha vikas aghadi vs mahayuti eknath shinde devendra fadnavis ajit sharad pawar udhhav thackeray nana patole maharashtra politics
social share
google news

Zee News Matrize Opinion Poll, Mahayuti vs Maha Vikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या बैठका आणि चर्चासत्र सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi)  थेट लढत होणार आहे. या निवडणुकीपुर्वी ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळेल, असा सर्वे समोर आला आहे. त्यामुळे नेमका पोलमधुन काय कौल वर्तवण्यात आला आहे? हे जाणून घेऊयात. (lok sabha election 2024 zee news matrize opinion poll survey maha vikas aghadi vs mahayuti eknath shinde devendra fadnavis  ajit sharad pawar udhhav thackeray nana patole maharashtra politics)

ADVERTISEMENT

कोणाला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी न्यूज मॅटरीजने महाराष्ट्रात सर्वे केला आहे. या सर्वेंक्षणात महाराष्ट्रातील लोकसभा  निवडणुकीत एनडीए आघाडी महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 3 जागा मिळतील, असे सर्वेतून समोर आले आहे.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुती जिंकेल असा अंदाज आहे. 

हे ही वाचा : Vidhan Sabha : देवेंद्र फडणवीसांना धमकी, रोहित पवारांचा फोन

कुणाला किती वोट मिळणार?  

झी न्यूज मॅटरीजच्या सर्व्हेनुसार वोट शेअर बद्दल बोलायचं झालं तर महायुतीला लोकसभा निवडणुकीत  61 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास विकास आघाडीला 30 टक्के मते मिळणार असल्याचे सर्वेत म्हटले आहे. तर इतर पक्षाला 9 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मराठा आरक्षणाचा किती फायदा होणार? 

सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र तरी देखील जरांगे पाटील समाधानी नाही आहेत. पण तरी या आरक्षणाचा महायुती सरकाराला किती फायदा होणार आहे? हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे. असे असले तरी मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा गट आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाने पाठिंबा दर्शवल्यास पक्षाला किंवा आघाडीली फायदा होण्याचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : 'मराठा आमदार-खासदार फडफड करायला लागलेत', जरांगेंचा पुन्हा इशारा

महाराष्ट्रात एनडीएची आघाडी म्हणजे महायुती एकनाथ शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपचा समावेश आहे. तर इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गट शिवसेना, शरद पवार गट आणि काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा समावेश आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे. या लढतीत सर्वेनुसार महायुतीचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता हा सर्वे किती खरा ठरतो, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT