Vidhan Sabha : देवेंद्र फडणवीसांना धमकी, रोहित पवारांचा फोन; भाजप आमदारांचा चढला पारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

''देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीस सारखे महाराष्ट्रातले अख्खे ब्राम्हण आम्ही 3 मिनिटात संपवू'',अशी धमकी दिल्याचा दावा आमदार कदम (Ram Kadam) आणि शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता.
devendra fadnavis threat bjp mla ram kadam ashish shelar allegation rohit pawar and yogesh sawant vidhan sabha maharashtra politics
social share
google news

Bjp Mla Ram Kadam and Ashish Shelar Serious Allegation on Rohit Pawar : विधानसभेत आज भाजप आमदार राम कदम आणि आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ''देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीस सारखे महाराष्ट्रातले अख्खे ब्राम्हण आम्ही 3 मिनिटात संपवू'',अशी धमकी दिल्याचा दावा आमदार कदम (Ram Kadam) आणि शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. फडणवीसांना दिलेल्या या धमकीमागे बारामती कनेक्शन असून रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला होता. या आरोपांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर या प्रकरणात तालिका अध्यक्षांनी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.  (devendra fadnavis threat bjp mla ram kadam ashish shelar allegation rohit pawar and yogesh sawant vidhan sabha maharashtra politics) 

विधानसभेच्या सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना भाजप आमदार राम कदम म्हणाले की,  ''देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीस तु कितीती आरएसएसचा..., देवेंद्र फडणवीस सारखे महाराष्ट्रातले अख्खे ब्राम्हण आम्ही 3 मिनिटात संपवू'',अशी धमकी दिल्याचा दावा राम कदम यांनी केला होता. पोलिसांनी स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीमागे योगेश सावंत नावाचा इमस असल्याची माहिती मिळाली होती. या योगेश सावंतचे सगळे कनेक्शन बारामतीशी असल्याचा आरोप राम कदम यांनी केला. तसेच याबाबतच्या अधिक माहितीत कळालं की, 'तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला आमदार, जो शरद पवार गटाचा आहे, त्यांचा नातेवाईकही आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. या रोहित पवारांचा योगेश सावंतशी संबंध काय? असा सवाल कदम यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा : 'मराठा आमदार-खासदार फडफड करायला लागलेत', जरांगेंचा पुन्हा इशारा

आशिष शेलारांनी देखील याच विषयावरून शरद पवार गटावर आरोप केले आहेत. एखाद्याने किती जातीवाचक असाव, याचा हा  कळस आहे. 'एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू. देवेंद्र फडणवीस तुला संपवून''. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर चौकशीत योगेश सावंत नावाचा व्यक्ती सापडला. हा योगेश सावंत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा शरदचंद्र पवार गटाचा आयटीसेलचा पदाधिकारी आहे. त्याचा पत्ता देखील बारामतीच्या मतदार संघातलाच आहे. त्यामुळे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत? शरद पवार गटाचा याच्याशी काही संबंध आहे का? रोहित पवारांनी फोन केला होता का? त्याचं कारण काय? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार आणि राम कदम यांनी उचलून धरली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तालिका अध्यक्षांचे चौकशीचे आदेश 

या आरोपावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले की, कुणाचेही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का?, इथे शरद पवारांचे नाव घेता येते का? 57 ची नोटीस दिली का? कुणाचंही नाव घ्यायचं असेल तर त्या नोटीस द्यायची आवश्यकता आहे की नाही.तुम्ही असं कसं नाव घेता आहे. तुम्हाला आरोप करायचे आहेत, तर नोटीस द्या आणि आरोप करा ना, पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं, कसा घेता येईल, याचा खुलासा आपण केला पाहिजे, असे विजय वडेट्टीवारांनी यावेळी म्हटले आहे. तसेच भाजप आमदारांच्या या आरोपानंतर तालिका अध्यक्षांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : ठरलं! ठाकरेंचे उमेदवार 'या' चिन्हावर लढवणार लोकसभा

आरोपांवर रोहित पवार काय म्हणाले? 

तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस भाजप आमदारांवर चिडले होते, कारण त्या बैठकीत कोणताही आमदार त्यांच्या बाजूने बोलला नाही. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी भाजप आमदार आरोप करत असल्याचे रोहित पवारांनी या आरोपांवर म्हटले.  तसेच ज्यांनी त्या समाजसेवकाची मुलाखत घेतली, त्या व्यक्तीवर कारवाई केली का? ज्या युट्युबवर ही मुलाखत दाखवली त्यावर करावाई झाली का? मग कार्यकर्त्यांवर कारवाई का? असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT