जरांगे पाटलांचा फडणवीसांना पुन्हा इशारा, 'काही झालं तरी मागे हटणार नाही'
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यामुळे भाजपसह अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीसांंनी इशारा देत, 'काही झालं तरी मी आता मागे हटणार नाही' असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मी आता मागे हटणार नाही', जरांगेंचा पुन्हा इशारा

आमदार-खासदार फडफड करायला लागलेत
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्याने जरांगे पाटील यांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलत पुन्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टार्गेट केले.
आत टाकून दाखवा
आता काहीही झाले तरी मागे हटणार नाही नसल्याचे सांगत तुम्ही फक्त आत टाकून दाखवा मग लाट काय असते ते तुम्हाला कळेल असा थेट इशाराही जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
मी मागे हटणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी सरकावर जोरदार निशाणा साधताना आता काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. माझ्यासाठी तुम्ही कोणताही यंत्रणा वापरली तरी आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
उभं आयुष्य पणाला लावलं
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. कारवाईसाठी रात्रीच्या वेळी कारवाया सुरू आहेत, मात्र मी समाजासाठी लढतो आहे. उभं आयुष्य पणाला लावलं असून आम्हाला कायदा कळत नाही असं नाही, त्याच बरोबर सरकार कधी संचारबंदी लावू शकतं हे ही सगळं आम्हाला माहिती असल्याचे सांगितले.