Maharashtra Budget 2024 : 'या' कुटुंबियांना मिळणार 3 मोफत सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचे निकष काय?
Mukhymantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून 3 सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे या योजनेचा नेमका कोणत्या कुटुंबियांना फायदा होणार आहे?
ADVERTISEMENT
Mukhymantri Annapurna Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या होत्या. यात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून 3 सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे या योजनेचा नेमका कोणत्या कुटुंबियांना फायदा होणार आहे? या योजनेचे निकष काय आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra budget 2024 these women get three free cylender every year in mukhymantri annapurna yojana)
ADVERTISEMENT
महिला या किचनचं संपूर्ण बजेट सांभाळतात. मात्र सध्या घरगुती गॅसचे दर अधिक असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे या गृहिणींना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. परंतु ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाही आहेत. त्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत.
हे ही वाचा : संशयाच भूत डोक्यात शिरलं, लोखंडी रॉडने पत्नीला संपवलं; नेमकं काय घडलं?
ज्या महिलांकडे बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आहेत. अशा महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.
हे वाचलं का?
महिलांसाठी नेमक्या कोणत्या घोषणा झाल्या?
- सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
- दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
- पिंक ई रिक्षा - १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - ८० कोटी रुपयांचा निधी
- "शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
- राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
हे ही वाचा : Maharashtra Budget 2024 : 'मत'पेरणी! शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या 'या' मोठ्या घोषणा
- रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
- जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
- ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
- लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
- महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
- ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
- मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
- या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT