एकनाथ शिंदे आणि भाजपात रंगतंय 'चेकमेट'चं राजकारण, समांतर ताकदीसाठी तगडे मोहरे गळाला
Maharashtra Politics : 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्यास त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदे आणि भाजपात रंगतंय 'चेकमेट'चं राजकारण
समांतर ताकदीसाठी तगडे मोहरे गळाला
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्षाची धार तीव्र होताना दिसत आहे. आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्यास त्यांना प्रभावीपणे शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखली आहे. साताऱ्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शिंदेंनी 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांमध्ये तगडे राजकीय प्रतिस्पर्धी आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाची समांतर ताकद निर्माण करून भाजपसमोर मोठे आव्हान उभे करणे, हा या हालचालींमागचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुरु केलेली ही मोर्चेबांधणी राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी मानली जात आहे.
हेही वाचा : बारामती पोटनिवडणूक : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी कोणते नेते गळाला लावलेत?
पंढरपूर-मंगळवेढा: भाजप आमदार समाधान अवताडे यांच्याविरोधात शिंदेंनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना शिवसेनेत प्रवेश देण्याची तयारी करून मोठे आव्हान उभे केले आहे.
अक्कलकोट हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आमदार आहेत. शिंदेंनी सिद्धराम म्हेत्रेंना पक्षात घेऊन या मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आहे. सिद्धराम म्हेत्रे (माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार) हे अक्कलकोटमधील काँग्रेसचे मोठे नेते होते. जून २०२५ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.









