‘स्वत:च्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपद…’,नारायण राणेंची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता थेट राजीनामा देणं ही एक चूक त्यांना भोवल्याचं कोर्टाच्या निकालातून समोर आले आहे. याच उद्धव ठाकरे यांच्या चुकीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

Narayan Rane Criticize Uddhv Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा दिला आहे. त्यामुळे शिंदेचेच सरकार महाराष्ट्रात राहणार आहे. तर उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता थेट राजीनामा देणं ही एक चूक त्यांना भोवल्याचं कोर्टाच्या निकालातून समोर आले आहे. जर राजीनामा दिला नसता तर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचेही बोलले जात आहे. याच उद्धव ठाकरे यांच्या चुकीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra politics supreme court verdict narayan rane criticize uddhav thackeray)
पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले होते, त्याबाबतचा प्रश्न नारायण राणे यांना विचारला होता. यावर नारायण राणे म्हणाले, जर तर ला उत्तर देणार नाही. सु्प्रीम कोर्टाने नोंदवल त्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही. उद्धवचा प्रश्न काय आहे, त्याच्यावर काय बोलायच, बोलायला एक माणूस ठेवला आहे, त्याला विचारा तुम्ही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. तसेच आता उद्धव ठाकरेंचा प्रश्नच कुठे राहतो? शिवसेना संपली, अर्धी पण राहिली नाही, स्वत:च्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपद गेले आहे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असे नारायण राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : सुप्रीम कोर्ट निकाल: ठाकरेंना ‘ती’ एक चूक भोवली, महाराष्ट्रात शिंदेंचंच सरकार!
पवारांनी ठाकरेंची पात्रताच काढलीय
शरद पवार यांनी देखील पुस्तकात उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. उद्धव ठाकरेची पात्रताच काढलीय, तरीही आता भेटायला जाणार, महाविकास आघाडीत जाणार, पदासाठी लाचार. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही तर कोणाच्या तरी मागे जाणारच याच्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नाही अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.
तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा निर्णय़ अध्यक्षांकडे देण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे शिंदे सेफ राहणार आहेत, असे देखील नारायण राणे म्हणालेत.