मोठी बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले, भाजप आमदाराने नाव सांगितलं

मुंबई तक

Maharashtra Politics : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले, भाजप आमदाराने नाव सांगितलं

ADVERTISEMENT

Maharashtra Politics
Maharashtra Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले

point

भाजप आमदाराने नाव सांगितलं

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा खळबळ उडवणारा आरोप समोर आला आहे. शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी झालेल्या फुटीच्या घडामोडींमध्ये आमदारांना 50 कोटी देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता. आता भाजप आमदाराने देखील हा आरोप केला आहे. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी तब्बल 50 कोटी रुपये घेतल्याचा थेट दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेत 2022 मध्ये मोठा बंडाळीचा प्रसंग उभा राहिला होता, तेव्हा विरोधी पक्षांकडून “50 खोके एकदम ओके” ही घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आली. शिंदे गटाला सोबत गेलेल्यांवर मोठ्या पैशांची देवाणघेवाण झाल्याचे आरोप तेव्हाच करण्यात आले होते. मात्र हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे त्या वेळी गुवाहटीत गेले नव्हते. शेवटच्या क्षणी अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा : निलेश राणेंचा धमाका, भाजप नेत्याच्या घरावर धाड, प्रचाराची धामधूम सुरु असताचा बेहिशोबी 25 लाख सापडले

आता भाजपचे तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्या निर्णयामागे “50 कोटी रुपयांचा सौदा” झाल्याचा दावा केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. “पन्नास खोके घेतल्याचं सत्य आहे. संतोष बांगर यांनी शिंदे साहेबांकडून 50 कोटी रुपये घेतले,” असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. या आरोपामुळे आधीच शिवसेना-भाजप सुरु असलेले वाद वाढण्याची शक्यता आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp