Maratha Reservation: महाराष्ट्र पेटला! आरक्षणासाठी थेट आमदारांची घरं, ऑफिसं जाळली?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले त्यानंतर सरकारनेही आरक्षणासाठी कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे आता त्यांची तब्बेत खालवली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील मराठे आंदोलककर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज राज्यभर जाळपोळ आणि आमदारांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil protest for Maratha reservation was burnt, buses were set on fire, police vehicles were set on fire.
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण (Indefinite hunger strike) चालू केले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन मराठा आरक्षावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सरकारबरोबर बैठक करुन निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला वेळही दिला होता. मात्र सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले. मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनामुळे तब्बेत खालवल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी आक्रमक होत जाळपोळ सुरु केली. त्यातच आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आंदोलकांनी पेटवल्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक (Violent) वळण लागले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाळपोळ करत एसटीवर आणि पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमांना विरोध होत त्यांनाही कार्यक्रमस्थळावरुन त्यांना चले जावच्या घोषणा देत नेत्यांना परतवून लावण्यात आले आहे.
बीड: आमदारांचे घर पेटवले
बीड मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना घडत असताना जवळपास 200 ते 300 आंदोलक त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आल्यामुळे त्यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आली होती. हे असं असताना सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं होते. मात्र काही आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत ही दगडफेक केली
हे ही वाचा >> Crime: वासनांध पत्नी, प्रियकर अन् पतीच्याच पैशाने… हादरवून टाकणारी घटना
तहसिलदारांची गाडी पेटवली
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तहसिलदारांची गाडी रात्री आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. मराठा समाजाकडून मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात ठिक ठिकाणी उपोषण सुरू आहे. त्यातच आष्टीतील तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला रात्री अडीच वाजता आग लागल्याची घटना घडली. सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. गावोगावी आरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरु असतानाही काही ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या आहेत. अशातच आष्टीचे तहसिलदार यांची गाडी पेटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यानंतर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधला. त्यानंतर याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले.
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळमध्ये येणार होते. त्यासाठी त्यांच्या स्वागताचे फलकही शहरात ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र यवतमाळ शहराच्या राणा प्रताप गेटजवळ अज्ञातांकडून हे बॅनर फाडून टाकल्याची घटना घडली आहे. त्यानंतर हे फाडलेले बॅनर नगरपरिषदेच्यावतीने तात्काळ हटविण्यात आले
वसमतः मोटारसायकल रॅली
वसमत येथे मराठा समाजाकडून जक्का जाम आंदोलन करण्यात आल्यानंतर तिथेही उग्र आंदोलन करण्यात आले आहे. खंडाळा गावातून हिंगोलीकडे मोटारसायकल रॅली काढून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
.
शिर्डीः कोंबड्यांच्या गळ्यात नारायण राणे
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ शिर्डीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर नारायण राणेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी कोंबड्यांच्या गळ्यात नारायण राणेंचे फोटो लटकवण्यात आले होते. सचिन चौगुले यांनी नारायण राणे शिर्डीमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही यावेळी दिला आहे. हे आंदोलन चालू असतानाच 7 तरुण मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणास बसले आहेत.
हे ही वाचा >> Maratha Reservation : बीडमध्ये शरद पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय जाळलं! आंदोलन हिंसक वळणावर
यवतमाळः पोस्टरला काळे
यवतमाळमध्ये पोस्टर फाडल्याप्रकरणी आणि पोस्टरला काळे लावल्याप्रकरणी वातावरण प्रचंड तापले आहे. मराठा कुणबी क्रांती मोर्चाचे बिपीन चौधरी यांना या प्रकरणी पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले आहे. बिपीन चौधरी हे प्रहारचे जिल्हाप्रमुखसुद्धा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
परभणीः तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उग्र आंदोलन झाले आहे. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील मानोली येथे तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने जिल्ह्यात आंदोलन हिंसक वळण लागले होते. मराठा आरक्षण प्रश्नावरून मानवत तालुक्यातील मानोली येथील मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या ठिकाणी आलेल्या तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. मानोलीमध्ये आज सकाळपासून युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून, मराठा आरक्षणाच्या आंदोलनमध्ये सहभाग घेतला होता. तसेच आमरण उपोषणही सुरू केलं होतं. त्यावेळी तहसीलदारांनी या ठिकाणी आल्यानंतर, आंदोलकांबरोबर अरेरावीची भाषा वापरल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या रागातूनच युवकांनी तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करत गाडी फोडली आहे.
शिर्डीः चप्पल मारून सरकारचा निषेध
शिर्डीमध्येही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसवरील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवर जोरदार घोषणाबाजी करत पोस्टरला काळे फासण्याात आले. त्या फोटोवर चप्पल मारून सरकारचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. .
सोलापूरः …तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पुन्हा एकदा मराठा बांधवांनी हुसकावून लावले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची सभा घेण्यासाठी ते आले होते. त्यानंतर मराठा बांधव आक्रमक होत त्यांना हुसकावून लावण्यात आले. सोलापुरात आज सलग दुसऱ्यांदा मराठा बांधवांनी भाजप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना हुसकावून लावण्यात आले आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे हे सोलापूर जिल्हा परिषदेच्या बाहेर पडले. यावेळी मराठा बांधवांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विरोधात चले जावच्या घोषणा दिल्या. एकाही आमदार-खासदार यांनी जिल्ह्यात पाय ठेवू नये अन्यथा त्यांना जिल्ह्याबाहेर हाकलून देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्राचा मणिपूर होईल असा इशारा मराठा समजाकडून देण्यात आला.
धुळे: जोडे मारत जाळली प्रतिमा…..
धुळे येथे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिमेची सकल मराठा समाजाच्यावतीने अंत्ययात्रा काढण्यात आली. महानगरपालिका चौकात जोडे मारत प्रतिमाही यावेळी जाळण्यात आली. यावेळी आरक्षणाला विरोध करणाऱ्याचा धिक्कार असो, केंद्रासह राज्य सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
जेल रोड ते महानगरपालिका चौकापर्यंत राणे व कदम यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा वाजत गाजत काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांनी वादग्रस्त विधान करुन वाद वाढवला होता.
मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द…
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम आता एसटी बस सेवेवरही होत आहे. यामुळे सोलापूरमधून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. धाराशिव आणि तुळजापूर वगळता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूरकडे जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या थांबवण्यात आल्या. सोलापूर बस डेपोच्या मराठवाड्यात जाणाऱ्या जवळपास 40 फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
हिंगोलीः मराठा आंदोलन पेटलं
हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला तर, शेतकरी मराठा बांधवांनी चक्क रस्त्यावर जनावरे बांधून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. हिंगोलीतील वसमत तालुक्यात आंदोलकांकडून अनेक ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला आहे. वसमत शहरातील जिंतूर रोडवर मराठा आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन सुरु केले होते. तर दुसरीकडे वासमत पाटीजवळ मराठा आंदोलकांडून टायर पेटवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तर वसमत तालुक्यातील कुरुंदामध्ये मराठा समाज बांधवांनी चक्क रस्त्यात बैल गाड्या आणि गुरे रस्त्यावर बांधून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यामुळं वसमत हिंगोली जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पुरंदरः भाजपा नेत्यांना हाकलले
पुरंदरचे माजी आमदार भाजप नेते अशोकराव टेकवडे यांना आज मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर भाजपचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनादेखील मराठा आंदोलकांनी, आंदोलन स्थळावरून हाकलून दिले आहे. धक्काबुक्की करून या दोन्ही नेत्यांना मराठा आंदोलकांनी हाकलून दिले आहे. तर सासवड येथील शिवतिर्थावर हे आंदोलन चालू असताना हे नेते आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र मराठा आंदोलकांनी या दोन्ही नेत्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्यास मज्जाव करत त्यांना बाहेर काढण्यात आले.
नांदेडः लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द
दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेडमध्ये एसटी बससेवा दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. तर लांब पल्याच्या अनेक बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्याच्या वाहनांसह अनेक ठिकाणी बसेसचीदेखील तोडफोड केली जातं आहे. नांदेडमध्येही बसवर दगडफेकीच्या घटना घडल्याने सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या नांदेड आगाराने जिल्हा अंतर्गत आणि लांब पल्ल्याची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेड, भोकर, हदगांव, लोहा, कंधार, बिलोली, देगलूर, किनवट या आगारातील सर्वच बस काल दुपारपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यात 350 हून अधिक बस जिल्हा अंतर्गत आणि इतर जिल्ह्यात धावतात. दोन दिवसा पूर्वी हदगाव उमरखेड मार्गावरील पैनगंगा पुलावर नांदेड-यवतमाळ जाणारी बस पेटवून देण्यात आली होती. रविवारी सकाळी माहूरमध्ये किनवटआगाराच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. ही घटना आष्टा फाट्यावर घडली होती. तर आंदोलकांनी नांदेड-हैद्राबाद महामार्ग बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
धाराशिवः टायर जाळले
मराठा आरक्षण आंदोलन सध्या पेटलं असून सोलापूर-धुळे महामार्गांवर रास्ता रोको करुन टायर जाळण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला असून जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले आहे. यापुढेही आक्रमक आंदोलनाचा इशारा देत आमदार खासदार आणि मंत्र्यांना आता रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या वाहनांवर दगडफेक
माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आपल्या सुरक्षारक्षकांसह घटनास्थळी रवाना होत होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्या गाडीवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कुमावत यांच्या बॉडीगार्डला डोक्यावर जबर मार लागला असून त्यांना 6 टाके पडले असल्याची माहिती देण्यात आला आहे.
हिंगोलीः बस जाळण्याचा प्रयत्न
हिंगोलीमध्ये बसस्थानकात घुसून अज्ञातांडून दोन बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानीही टळली आहे. तर बसला लागलेली आग विझवताना एक कर्मचारी जखमी झाल्याचेही माहिती सांगितली. या घटनेनंतर पोलीस पथक दाखल झाल्यानंतर आंदोलन करणारे पळून गेले आहेत.
सांगली : शोले स्टाईल आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक प्रशासकीय इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. 50 हुन अधिक कार्यकर्त्यांनी इमारतीवर चढून घोषणा देत केले आंदोलन. सांगली जिल्ह्यातील विटा येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीवर चढून घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या प्राणांची परवा न करता उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज विटा यांच्यावतीने अनोखे आंदोलनास सुरुवात झाली. मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर जोरदार हल्लाबोलही करण्यात आला आहे. मराठा आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून हे आंदोलन विट्यातूनच शेवट होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
बारामतीः अजित पवारांच्या पोस्टरला काळे
बारामतीत मराठा समाज आक्रमक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत असतानादेखील सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टला काळे फासत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
साताराः बाईक रॅली
साताऱ्यात आरपीआयच्या गवई गटाकडून बाईक रॅलीचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून साताऱ्यामध्ये रॅली काढण्यात आली आहे. तर जिल्हाधिकार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी ही करण्यात आली. साताऱ्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आरक्षण मिळेपर्यत मागे हटणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली होती.
लातूरः पाण्याच्या टाकीवर ठिय्या
मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून लातूरमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मागणीवरून शहरातील गांधी चौकात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून काही महिलांनी शोले स्टाईलने आंदोलन करत ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे काल दुपारपासून या महिलांचे हे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तात्काळ सरकारने दखल घेत सरसकट मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी या महिलांनी कालपासून पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला होता.
परभणीः तहसिलदारांची गाडी फोडली
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालयाच्या आवारात उभे असलेली तहसिलदारांची गाडी आंदोलनकर्त्यांनी लक्ष केली. या घटनेमध्ये गाडीच्या कांचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज दुपारच्या सुमारास, पूर्णा तहसील कार्यालयामध्ये तहसिलदारांची गाडी उभा होती. त्यावेळी काही अज्ञातांनी कंपाउंडवरून प्रवेश करत, गाडीच्या काचा फोडल्या होत्या. तर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यापूर्वीही मानवत तालुक्याच्या तहसीलदारांची मानोली फाट्याजवळ फोडण्यात आली होती.
नांदेडः स्वतःचे शरीर मातीमध्ये
नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन केले. तर दुसरीकडे युवकाने स्वतःचे शरीर मातीमध्ये गाढून घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहे. आज लोहा तालुक्यात नांदेड,लातूर रोडवरील पार्डी गावाजवळ सकल मराठा सामाजातील 6 तरूण बीएसएनएल टॉवरवर चढले होते. तब्बल 4 तासापासून हे तरूण टॉवरच होते.तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या कलादगाव येथे एका मराठा युवकांनी आगळे वेगळे आंदोलन करत स्वतःचे शरीर मातीमध्ये गाढून घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
सोलापूरः कुणबी प्रमाणपत्र नको
प्रताप कांचन या तरुणाने मी 96 कुळी मराठा आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं विधान केले होते. त्या विधानाच्या विरोधात मराठा बांधवांनी प्रताप कांचन यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून त्याला मारहाण करण्यात आली आहे. प्रताप कांचन या तरुणाच्या अंगावर ऑइल टाकून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाणही केली आहे. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी कांही दिवसांसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्राला विरोध केला होता. त्याप्रकरणी त्यांना मारहारण करण्यात आली होती. माफी मागत प्रताप कांचन या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मराठा समाजातील तरुणांनी उठबशा काढायला लावल्या.
शिरुरः आरक्षणासाठी मुंडन
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज या अन्न त्याग आंदोलनात आमदार अशोक पवारही सहभागी झाले होते. यावेळी मराठा बांधवांनी आरक्षणासाठी मुंडन करत जोरदार घोषणाबाजी केली असून समाजापेक्षा कोणी ही मोठा नाही असं मत व्यक्त केले आहे. आरक्षणासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला ही तयार असल्याचं आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
पंढरपूरः नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे
पंढरपुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांनी पंढरपूर नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. अचानक पणे नगरपालिकेला टाळे ठोकल्याने नागरिकांबरोबर नगरपालिका कर्मचारीही आतामध्ये आडकले होते.
आंबेगावः सर्वपक्षीय नेत्यांना श्रद्धांजली
आंबेगाव: हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या जन्म गावी सर्वपक्षीय नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व नेत्यांच्या प्रतिमा जाळून टाकण्यात आल्या असून आरक्षण दिले नाही तर हे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT