Maratha Reservation : बीडमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला आंदोलकांनी पेटवला
बीडमध्ये संतप्त मराठा आंदोलकांनी आता माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या माजलगाव परीसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
Maratha Protester Burnt Mla Prakash Solanke House : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटत चालला आहे. कारण राज्यभरात आमरण उपोषणे, आंदोलने सुरु आहेत. याच आंदोलनाला आता बीडमध्ये हिंसक वळण प्राप्त झाले आहे. बीडमध्ये संतप्त मराठा आंदोलकांनी आता अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Mla Prakash Solanke) यांचा बंगला जाळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या माजलगाव परीसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (maratha reservtion maratha protester burnt mla prakash solanke house and burn two wheeler manoj jarange patil agitation)
ADVERTISEMENT
बीडच्या माजलगावमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. सतंप्त मराठा आंदोलकांनी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (Mla Prakash Solunke) यांच्या घरावर सुरुवातीला दगडफेक केली होती. या दगडफेकीनंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. यासह घराबाहेर असलेल्या वाहनांसह दहा दुचाकी देखील पेटवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीडमध्ये मराठा आंदोलन हिंसक वळणावर गेले आहे.दरम्यान या घटनेने बीडमध्ये तणावाची परीस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा : Maratha Reservation : उपसमितीच्या बैठकीत काय झालं? CM शिंदे दिली माहिती
दरम्यान आज आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आली होती. असं असताना सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले होते. मात्र काही आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत तुफान दगडफेक सूरू केली होती. या दगडफेकीनंतर संतप्त आंदोलकांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगला पेटवून दिला होता. या घटनेने परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा :Maratha Reservation : ‘मी विष पिऊन मरते, पण जरांगेंचा…’, मराठा आंदोलक महिला हंबरडा फोडत काय म्हणाली?
परभणीत तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक
मराठा आरक्षणावरून मानवत तालुक्यातील मानोली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला देखील हिंसक वळण प्राप्त झाले आहे. तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदारांनी आंदोलकांशी अरेरावीची भाषा वापरल्याने युवकांनी तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक करत गाडी फोडली आहे. या घटनेनंतर परीसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT