Ajit Pawar यांच्यावर भन्नाट मीम्स, यूजर्सच्या क्रिएटिव्हिटीला धुमारे…
अजित पवार यांच्याविषयी अनेक क्रिएटिव्ह मीम्स युजर्सनी तयार केली आहेत. पहा काही भन्नाट मीम्स…
ADVERTISEMENT

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 40 आमदारांसोबत भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला होता. यामुळे राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळेल अशी चर्चाही सुरू झाली होती. अखेर याबाबत स्वत: अजित पवारांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत या सर्व चर्चा आणि बातम्या फेटाळून लावल्या. यावेळी त्यांनी त्यांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत भाष्य केलं आहे. (Ajit Pawar has clearly declared his position whether he will go with bjp or not)
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आपण ज्या काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या दाखवत आहात, मी आपल्याला सांगेन की, त्यात यत्किंचितही तथ्य नाही. कोणत्याही आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पक्षातच कायम राहणार आहोत. बाकी सगळ्या अफवा आहेत. या प्रकारच्या बातम्यांना कोणताही आधार नाही.’ असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्याबाबत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!
मात्र या सगळ्या चर्चा आणि बातम्यांदरम्यान, ,अजित पवार यांच्याबाबत सोशल मिडियावर प्रचंड चर्चा झाली. त्यांच्या भूमिका त्यांचा स्वभाव याबाबत अनेकांनी वेगवेगळी मत व्यक्त केली. तसंच सोशल मिडीयावर अजित पवार यांच्याबद्दलचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अजित पवार यांच्याविषयी अनेक क्रिएटिव्ह मीम्स युजर्सनी तयार केली आहेत.
BJP: ‘जीवात जीव असेपर्यंत मी..’ अजित पवारांकडून एक घाव दोन तुकडे!
पहा अजित पवार यांच्यावरील काही भन्नाट मीम्स :
Thread on Maharashtra Politics
फडणवीस टू दादा pic.twitter.com/G5juGVDYOp
— Rohan (@rohanreplies) April 18, 2023