'अजित दादांवरचे आरोप क्लिअर झाले म्हणूनच तर ते...', रोहित पवारांचा सर्वात मोठा खुलासा
अजित पवारांवर लावण्यात आलेले आरोप क्लिअर झाल्यामुळे ते विलिनीकरण आणि त्यानंतर कोणासोबत जावं याबाबत चर्चा करत असल्याचा मोठा खुलासा आमदार रोहित पवार यांनी मुंबई Tak चावडीवर केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडद्यामागून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांना अजित पवार यांच्या निधनानंतर जास्तच उधाण आलं. मात्र चर्चांमधील मुख्य नेते असलेले अजितदादा यांच्या निधनामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू लंगडी पडली आणि विलिनीकरणाच्या चर्चा बासनात गुंडाळल्या गेल्या. पण त्याचवेळी प्रश्न असाही उपस्थित होत होता की विलिनीकरण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीसोबत? मुंबई Tak चावडी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
‘विलिनीकरणाची चर्चा ही केवळ अजित पवारांच्या अपघातामुळे थांबली. अपघात नसता तर १२ फेब्रुवारीला आम्ही एकत्र झालो असतो’असं थेट विधान रोहित पवार यांनी केलं आहे. पण याचनंतर त्यांनी याबाबत आणखीही काही मोठे खुलासे मुंबई Tak चावडीवर केले आहेत. पाहा रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांचा मोठा खुलासा
प्रश्न- विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी महायुतीचा भाग असती का?
रोहित पवार: दादांची गेल्या 4 महिन्यातली भाषणं तुम्ही बघा, ही भाजपच्या बाजूची होती की विरोधातली.









