Sanjay Shirsat यांनी लावली आमदारकी पणाला; सुषमा अंधारेंना दिलं आव्हान
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Shirsat vs Sushma Andhare :
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहेत, माझा भाऊ, माझा भाऊ, म्हणतं आमच्यावर जी टिका करत आहेत त्या माफ करायच्या का? असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसंच मी काय चुकीचे बोललो आहे? त्यातील एखादं वाक्य दाखवा की त्यात त्यांची मानहानी करणाारं आहे. मी जर काही अश्लील बोललो असेन तर तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन, अशी भूमिकाही शिरसाट यांनी घेतली. (MLA Sanjay Shirsat’s resplied to the Sushma Andhare on controversial statement)
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या एका सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ, भुमरे भाऊ माझेच भाऊ, काय-काय लफडी केली आहे, तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची 38 वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही लोक टाळ्या वाजवत आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली होती.
हे वाचलं का?
हेही वाचा : शिंदे, फडणवीस, मी अन् 150 बैठका; सत्तांतराबद्दल तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट, महाराष्ट्रात खळबळ
याचवरुन सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत लफडी या शब्दावर आक्षेप घेतला आहे. संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आणि बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असं अंधारे म्हणाल्या.
संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर :
यावरच आता संजय शिरसाट यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहेत, माझा भाऊ, माझा भाऊ, म्हणतं आमच्यावर जी टिका करत आहेत त्या माफ करायच्या का? मी काय चुकीचे बोललो आहे? त्यातील एखादं वाक्य दाखवा की त्यात त्यांची मानहानी करणाारं आहे. मी जर काही अश्लील बोललो असेन तर तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Savarkar Row : …तर राहुल गांधी आज कुठे दिसलेही नसते; सावरकरांवरील टीकेवरून शरद पोंक्षे भडकले
सुषमा अंधारेंना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. हे नाते जपणारे लोक आहोत. पण तुम्ही जाहीर भाषणात ‘संज्या’ म्हणणार, वरातीतील ‘घोडा’ म्हणणार? तुझं वय काय माझं वय काय? हे संस्कृतीला धरुन आहे का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सुषमा अंधारेंनी महिला आयोगाकडे तक्रार नक्कीच करावी. चौकशी झालीच पाहिजे. पण, मी काय चुकीचे बोललो, हे तरी त्यांनी सांगावं.
ADVERTISEMENT
रुपाली पाटील-ठोंबरेंनाही प्रत्युत्तर :
संजय शिरसाट यांनी मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट कोणासाठी घेतला? 2 फ्लॅट कोणासाठी घेतले? त्यांच्याकडे 72 कोटी कॅश कुठून आली, पाटील नावाच्या व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न संजय शिरसाट यांनी का केला, त्यासाठी आपली संपूर्ण ताकद का लावली असे काही सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अॅड. रूपाली पाटील – ठोंबरे यांनी उपस्थित केले होते. यावर शिरसाट म्हणाले, माझी तिची भेट झालेली नाही. मुंबईत 2 घरं कशासाठी घेतले, असं विचारता? मग मी कुठं रहायला पाहिजे. जर 2 फ्लॅट असतील तुमच्या नावावर करुन घ्या, असा सल्लाही शिरसाट यांनी ठोंबरे यांना दिला.
हेही वाचा : उद्धव ठाकरे, आदित्य अन् संजय राऊत हाजीर हो! शेवाळेंच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचे आदेश
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT