Mood Of the Nation: कोण आहे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री?, CM शिंदेंना फक्त 'एवढे' टक्के पसंती

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

देशभरातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचा देखील सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या स्थानी आहेत? हे जाणून घेऊयात.
mood of the nation 2024 who is the famous cm in county where is eknath shinde yogi adityanath maharashtra politics
social share
google news

MOTN Survay Cm Eknath Shinde : इंडिया टुडेने सी व्होटर्सच्या सहकार्याने नुकताच मूड ऑफ द नेशन सर्व्हे पुर्ण केला आहे. या सर्वेतून देशभरातील अनेक राज्यातील लोकसभा निवडणुकीचा कौल सांगण्यात आला. त्याचप्रमाणे देशभरातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचा देखील सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या स्थानी आहेत? त्यांना किती टक्के लोकांनी पसंती दिली आहे. हे जाणून घेऊयात. (mood of the nation 2024 who is the famous cm in county where is eknath shinde yogi adityanath maharashtra politics)  

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापण केले होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकामागोमाग एक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. कोणतीही दुर्घटना असो किंवा गंभीर घटना असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:ला एक सर्वसामान्य, शेतकरी, कामगार वर्गासाठी धावणारा, रस्त्यावर उतरणारा मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला दाखवण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदेंना किती टक्के पसंती मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. 

मुड ऑफ द नेशन सर्वेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त 1.9 टक्केच लोकांची पसंती आहे. एकंदरीत संपूर्ण देशातील मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे शेवटून तिसऱ्या स्थानी येतात. तर पहिल्या स्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशातील कोणता मुख्यमंत्री कोणत्या स्थानी? 

मूड ऑफ द नेशन सर्वेनुसार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. योगी आदित्यनाथ यांना 46.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. या आधी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेत योगी आदित्यनाथ यांनी 43 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. 

ADVERTISEMENT

योगी आदित्यनाथ नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 19.6 लोकांनी पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना 8.4 टक्के लोकांची पसंती आहे. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टँलिन यांना 5.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये 2.5 टक्के लोकांनी वोट केले आहे. 

ADVERTISEMENT

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना 2.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना 2 टक्के लोकांची पसंती आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो. मुख्यमंत्री शिंदे यांना 1.9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 0.5 टक्के लोकांनी वोट केले आहे. आणि सगळ्यात शेवटच्या स्थानी भूपेद्र भाई पटेल आहेत, त्यांना 0.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT