‘नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे नवाब मलिक सुटले’, राऊतांना नेमंक म्हणायचं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nawab malik getting bail sanjay raut has criticized bjp government maharashtra politics news live
nawab malik getting bail sanjay raut has criticized bjp government maharashtra politics news live
social share
google news

Sanjay Raut on Nawab Malik Bail: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल 16 महिन्यानंतर जामीन (Bail) मंजूर झाला. पण त्यांनी सरकारशी सुसंगत भूमिका घेतल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाली असल्याचा दावा अनेक विरोधक करत आहेत. तशाच स्वरुपाचं विधान आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. नवीन इंजेक्शन घेतल्यामुळ नवाब मलिक सुटले असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच देशद्रोहाचं कलम जे काढून टाकण्यात आलं आहे त्यावरुन देखील संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका करत त्यांच्या सरकारची थेट ब्रिटिशांशी तुलना केली आहे. (nawab malik getting bail sanjay raut has criticized bjp government maharashtra politics news live)

ADVERTISEMENT

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे नवाब मलिक सुटले. काल म्हणे केंद्र सरकारने देशद्रोहाचा जो कायदा होता तो रद्द केला, ब्रिटिशकालीन कायदा रद्द केला.. पण त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना अडकवताय. राजकीयदृष्ट्या ज्यांचा आपल्याला भविष्यात त्रास होईल अशा अनेक राजकीय कार्यकर्त्यांना आपण तुरूंगात टाकता. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केला याचं फार कौतुक सांगू नका. ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायदे आपण निर्माण केले आहेत.’

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, मीच शहाणा..’ आशिष शेलारांची जहरी टीका

‘जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेता.. महाराष्ट्रात बघा.. काय सुरू आहे.. नवाब मलिक 16 महिन्यानंतर सुटले. पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते याच खटल्यात, अशाच प्रकारच्या कायद्यामध्ये.. त्यांना आपण मंत्री केलंय. तेव्हा हे सगळं काही चाललं आहे ते देश हुकूमशाहीकडे चालल्याचं लक्षण आहे. म्हणून माझं आव्हान आहे सरकारला की, आपण जो देशद्रोहाचा कायदा जो मागे घेतलाय याची फार टिमकी वाजवू नका. ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांसाठी करतायेत. तो देशद्रोहाच्या वर आहे.’

हे वाचलं का?

‘आम्हाला आनंद आहे की, राजकारण-समाजकारणातील एक सहकारी 16 महिन्यानंतर मोकळा श्वास घेणार आहेत. त्याबाबत आनंद आहे. नवाब मलिक 16 महिन्यानंतर वैद्यकीय जामिनावर सुटले आहेत. याचा आनंदच आहे. त्यांची प्रकृती खराब होती, आहे.’

हे ही वाचा >> Nawab Malik: ‘..म्हणून मलिकांना जामीन’, पृथ्वीराज चव्हाणांना ‘तो’ संशय; गंभीर आरोप

’16 महिने एक मंत्री, आमदार तुरुंगात ठेवला जातो. त्याची सुनावणी सुरू होत नाही. आपला राजकीय विरोधक त्याच्याविरोधात हा कट रचला जातो ज्या कायद्याअंतर्गत तो ब्रिटिशांपेक्षाही भयंकर आहे.’

ADVERTISEMENT

‘या देशात कोणी देशद्रोही नाही.. पण ज्याच्याविरोधात देशद्रोहाचा कायदा लागू केला पाहिजे होता त्याच्यावर लावला नाही. पुण्यात प्रदीप कुरुळकर ज्याने पाकिस्तानला आपल्या लष्कराची गुप्त माहिती दिली. जो आरएसएसचा कार्यकर्ता आहे त्यावरच देशद्रोहाचा गुन्हा नव्हता नोंदवला. त्याला वाचविण्यासाठी आपण हा कायदा हटवला का? अशी दहा उदाहरणं मी देऊ शकतो.’ असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT