NCP अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांची हत्या, भायखळा परिसरात नेमकं काय घडलं? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sachin Kurmikar Murder Case Latest Update
Sachin Kurmikar Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते यांच्या हत्येचं कारण काय?

point

सचिन कुर्मीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

point

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुर्मीकर यांची हत्या झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Sachin Kurmikar Murder :  राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांची हत्या झाली आहे. ही धक्कादायक घटना भायखळ परिसरात घडलीय. अज्ञात लोकांनी कुर्मीकर यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

ADVERTISEMENT

या हल्ल्यात कुर्मीकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी कुर्मीकर यांनी जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारादरम्यात कुर्मीकर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. (Nationalist Congress Partys Ajit Pawar Group leader Sachin Kurmikar has been murdered. This shocking incident happened in Byculla area)

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: '...तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होईल', शिवसेनेच्या 'या' आमदाराचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते आणि तालुकाध्यक्ष सचिन कुर्मीकर यांच्यावर अज्ञात इसमांनी भायखळा परिसरात जीवघेणा हल्ला केला. हल्लेखाराने कुर्मीकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर कुर्मीकर हे गंभीररित्या जखमी झाले.

हे वाचलं का?

या धक्कादायक प्रकाराबद्दल माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुर्मीकर यांना जे जे रुग्णालयात दाखल केलं. परंतु, कुर्मीकर यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 

हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते राज्यातील समस्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांचा खून झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT