Amar Kale: शरद पवार गटातील 7 खासदारांची अजित पवार गटात होणार एन्ट्री? अमर काळे म्हणाले, "मला फोन आला होता..."
Amar Kale On NCP MP's Horse Trading: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना राजकीय वर्तुळात रंगला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी मारली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार गटात येण्यासाठी शरद पवारांच्या खासदारांना कोणी केला फोन?
Amar Kale On NCP MP's Horse Trading: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना राजकीय वर्तुळात रंगला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी मारली. परंतु, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने 41 आमदार निवडून आणत पलटवार केला. महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा दावेदार ठरलेल्या एनसीपी अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या एनसीपीत खासदार फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी मुंबई तकशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
खासदार अमर काळे 'मुंबई तक'शी बोलताना नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आता अजित पवार यांच्या संपर्कात आलेले आहेत. तशाप्रकारचे प्रयत्न होत आहेत. तुम्हाला फोन आला होता संपर्क करण्यासाठी? यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमर काळे म्हणाले, "मला फोन आला होता..पण तो अजितदादा गटाकडून आला नाही. ज्यांचा अजितदादा गटाशी कोणताही संबंध नाही. ते त्या गटाचे नेते किंवा पदाधिकारी नाहीत. अशा व्यक्तीकडून संपर्क करण्याचा प्रयत्न झालाय. ज्या व्यक्ती पहिले एनसीपीच्या नेत्या होत्या. पण सध्या नाही. त्या आता काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव आला आहे"'.
हे ही वाचा >> Sambhajinagar Honour Killing : जातीबाहेरच्या मुलाशी प्रेमसंबंध, भावाने बहिणीला थेट दरीत ढकललं, क्रिकेट खेळणाऱ्या पोरांमुळे घटना उघड
काळे पुढे म्हणाले, काँग्रेसमधला व्यक्ती मध्यस्ती म्हणून अजित पवारांची का मदत करेल, यावर अमर काळे म्हणाले, ज्या व्यक्तीकडून पहिलं प्रपोजल आलं होतं. ती व्यक्ती पहिले एनसीपीची नेता होती. एनसीपीत दोन गट व्हायच्या आधी ती एनसीपी नेता होती. नंतर मग त्यांनी काँग्रेस जॉईन केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी एनसीपी सोडून काँग्रेस जॉईन केलं. आता अजितदादांसोबत त्यांचे जवळचे संबंध असू शकतात. त्या माध्यमातून अजितदादांकडे हे सात खासदार आले पाहिजेत. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
हे ही वाचा >> Beed News : बीड पुन्हा हादरलं! पोलीस मुख्यालयातच झाडाला गळफास घेऊन पोलीस हवालदाराने स्वत:ला संपवलं, नेमकं कारण काय?
ही महाविकास आघाडीची प्रताडना नाही का? जेव्हा आम्ही तिकडे जाऊ, तेव्हा ती प्रताडना होईल. एनसीपी अजित पवार गटाच्या नेत्यांना या कॉलबाबत विचारलं असता, ते म्हणाले, आमच्याकडून असं काही नाही. आम्ही कुणाला बोलायला सांगितलं नाही. काँग्रेसमधील महिला पदाधिकारी आहेत. पहिले एनसीपीच्याच नेत्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी एनसीपी सोडली. आता त्या काँग्रेसमध्ये आहेत. त्या काँग्रेस सोडून एनसीपीत येऊ शकतात. महाविकास आघाडीत भूकंप होऊ शकतो, याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना तक्रार केली आहे का? हा विषय आम्ही फार गांभीर्याने घेतला नाही. त्यांनी प्रपोजल ठेवलं. आम्ही ऐकून घेतलं. इथपर्यंत हा विषय संपला. शरद पवार साहेबांसोबत याबाबत चर्चा झाली. त्यांना याची कल्पना आधीच होती, असंही काळे म्हणाले.