Disha Salian: महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, 'दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या' वडिलांनी घेतलं थेट आदित्य ठाकरेंचं नाव!
Disha Salian Death and Aditya Thackeray: दिशा सालियान हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी असा गंभीर आरोप करत दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिशा सालियान प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप

दिशा सालियानच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केली याचिका

दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलं थेट आदित्य ठाकरेंचं नाव
Disha Salian Death: मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणारी सर्वात मोठी बातमी ही नुकतीच समोर आली आहे. दिवंगग अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी आता तिच्या वडिलांनी अत्यंत धक्कादायक आणि अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे असं प्रचंड खळबळजनक आरोप केले असून त्याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, दिशा सालियान हिचा अपघाती मृत्यू झाला नव्हता. तर तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape)करून तिची हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकार लपविण्यासाठी आरोपींनी दिशाने आत्महत्या केल्याचे भासवलं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे आणि इतरांची चौकशी करावी. अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
यावेळी दिशाच्या वडिलांनी असंही म्हटलं आहे की, दिशाचा मृत्यू हा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडलेला आहे आणि या सगळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी केली जावी.
हे ही वाचा>> दिशा सालियन मृत्यू: आदित्य ठाकरे शिंदेंच्या रडारवर; विधानसभेत गदारोळ
8 जून 2020 रोजी मुंबईतील मालडमधील इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा दावा आता दिशाच्या वडिलांनी केला आहे. आता या प्रकरणी याचिका दाखल झालेली असून त्यात थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.