Nagpur Violence: नागपूर हिंसाचारासाठी फडणवीसांनी 'छावा' सिनेमाला ठरवलं जबाबदार?
छावा सिनेमामुळे लोकांमध्ये औरंगजेबाबाबतचा राग हा बाहेर पडत आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचाराबाबत निवदेन करताना केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं विधानसभेत निवेदन
छावा सिनेमानंतर औरंगजेबाबत लोकांचा राग बाहेर आला, फडणवीसांचं विधान
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
Chhaava Movie CM Devendra Fadnavis: मुंबई: औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यातच काल (17 मार्च) रात्री दोन गटात अचानक राडा झाला आणि नागपूरमध्ये हिंसाचार भडकला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात भडकलेल्या या हिंसाचारामुळे विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून सरकारला घेरलं आहे. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (18 मार्च) विधानसभेत नागपूर हिंसाचारावर सविस्तर निवदेन दिलं. पण याच निवदेनात फडणवीसांनी थेट 'छावा' सिनेमाचा उल्लेख केला.
'छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे लोकांमध्ये औरंगजेबाबद्दल जो राग आहे तो बाहेर पडत आहे.' असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बोलताना केलं.
'छावा सिनेमामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाला...'
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, 'खरं म्हणजे, आज महाराष्ट्रात विशेषत: म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीए. खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही मोठ्या प्रमाणात बाहेर येतो आहे.'
'या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी सयंम राखला पाहिजे. यासोबत मी ही देखील चेतावणी देतो की, कोणीही याठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात-धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांवर कोणी केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> नागपूर कुणी पेटवलं? सभागृहात निवेदन, देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती...
नागपुरात हिंसाचार का भडकला?, CM फडणवीसांचं निवेदन जसंच्या तसं...
काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114 - 2025 नुसार भारतीय न्यायसंहिता 299, 37 (1) (3) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हाँ गुन्हा दाखल केला.










