Jagdeep Dhankhar : ‘मी हे 20 वर्षांपासून सहन करतोय’, PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

the Vice President jagdeep dhankhar said, 'Spoke to PM Modi on telephone. He expressed grief over the disgusting theatrics of some MPs in the sacred Parliament complex.
the Vice President jagdeep dhankhar said, 'Spoke to PM Modi on telephone. He expressed grief over the disgusting theatrics of some MPs in the sacred Parliament complex.
social share
google news

PM Modi Jagdeep Dhankhar : खासदाराने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतींना फोन करून खंत व्यक्त केली. ही घटना दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (Prime Minister narendra Modi calls Vice President Jagdeep Dhankhar)

ADVERTISEMENT

याबद्दल उपराष्ट्रपती धनखड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी फोन करून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून आपणही अशाप्रकारचा अपमान सहन करत आहोत, असेही पंतप्रधानांनी कॉलवर सांगितले, असेही ते म्हणाले.

मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन, काय झाली चर्चा?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत उपराष्ट्रपती म्हणाले, “पंतप्रधान मोदींशी टेलिफोनवरुन बोललो. पवित्र संसदेच्या संकुलात काही खासदारांच्या घृणास्पद नाट्याबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले. गेल्या वीस वर्षांपासून ते असा अपमान सहन करत असल्याचे त्यांनी मला सांगितले. भारतात उपराष्ट्रपतीसारखे घटनात्मक पद असलेल्या संसदेत असे घडणे दुर्दैवी आहे.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> 7 ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत

उपराष्ट्रपतींनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “मी त्यांना (पीएम मोदी) सांगितले की, काही लोकांच्या कृती मला माझे कर्तव्य बजावण्यापासून आणि संविधानातील अंतर्भूत तत्त्वे राखण्यापासून रोखू शकत नाहीत. त्या मूल्यांसाठी मी मनापासून बांधील आहे. कोणताही अपमान मला माझा मार्ग बदलण्यास भाग पाडू शकत नाही.”

निलंबनानंतर खासदारांनी केली होती मिमिक्री

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी-मंगळवारी मोठा गदारोळ झाला. त्यानंतर गदारोळामुळे 141 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनाबाहेर बसून आंदोलन करत होते. यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांची नक्कल केल्याने उपराष्ट्रपती संतप्त झाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मनोज जरांगे भूमिकेवर ठाम, शिंदे म्हणाले, “आरक्षणाची का गरज, हे…”

या घटनेला लज्जास्पद असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे.

ADVERTISEMENT

ही घटना लज्जास्पद

या थट्टेवर नाराजी व्यक्त करताना अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले होते की, “हा केवळ शेतकरी आणि समाजाचा अपमान नाही, तर राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा आणि तोही एका राजकीय पक्षाच्या सदस्याने केलेला अपमान आहे. इतक्या जागा जिंकल्या. प्रदीर्घ काळ राज्य केले. संसदेतील एक ज्येष्ठ सदस्य दुसऱ्या सदस्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. मी तुम्हाला सांगतो मी खूप त्रास सहन केला आहे. इंस्टाग्रामवर, चिदंबरम जी, तुमच्या पक्षाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो नंतर काढून टाकण्यात आला, ही लज्जास्पद आहे”, असे ते म्हणालेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT