Baramati: 'अजितदादांची पत्नी सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच स्वीकारणार नाही', श्रीनिवास पवारांचं मोठं विधान
Shrinivas Pawar: अजित पवारांची पत्नी सुप्रिया विरोधात निवडणुकीला उभी राहते हे कधीही स्वीकारणार नाही. असं विधान अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar vs Shrinivas Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये सर्वांचं लक्ष हे बारामतीच्या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. कारण बारामतीत पहिल्यांदाच पवार वि. पवार अशी लढाई आहे. अशातच अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी India Today सोबत बोलताना एक मोठं विधान केलं आहे. 'अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया विरोधात उभ्या राहतात हे कधीही स्वीकारलंच जाऊ शकत नाही..' असं श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले. (it will never be accepted that ajitdada wife sunetra pawar contesting against supriya shrinivas pawar big statement)
अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तेत सामील व्हायचा निर्णय घेतला. पण याच निर्णयामुळे पवार कुटुंबात फूट पडली. अजित पवार हे केवळ भाजपसोबतच गेले नाही तर आपल्या बहिणीच्या विरोधात स्वत:च्या पत्नीलाचा म्हणजे सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. हीच बाब अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांना पटलेली नाही..
श्रीनिवास पवारांना अजितदादांचं 'हे' वागणं पटलं नाही, पाहा नेमकं काय म्हणाले...
प्रश्न: तुम्ही अजित पवारांचे सख्खे भाऊ आहात.. तरीही तुम्ही शरद पवारांची बाजू का निवडली?
श्रीनिवास पवार: मला वाटतं की, साहेब हे योग्य बाजूला आहेत.. आणि मी नेहमीच 'योग्य' बाजूकडे असतो.