Narendra Modi : ''भटकत्या आत्म्यामुळे राज्य अस्थिर...'', PM मोदींची नाव न घेता पवारांवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

narendra modi criticize sharad pawar on pune sabha loksabha election 2024 murlidhar mohol
भटकती आत्मा त्यांच्या पक्षातही काहीही करते, कुटुंबातही सोडत नाही.
social share
google news

PM Narendra Modi Criticize Sharad Pawar : ''महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे. आजपासून 45 वर्षापूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सूरूवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेला सुरूवात झाली. ही भटकती आत्मा काहीही करते. फक्त विरोधकांना अस्थिर करत नाही, तर त्याच्या पक्षातही काहीही करते, कुटुंबालाही सोडत नाही'', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली आहे.  (narendra modi criticize sharad pawar on pune sabha loksabha election 2024 murlidhar mohol) 

नरेंद्र मोदी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. खरं तर मोदींनी सुरूवातीलाच टीका वैयक्तिक घेऊ नये,असे असा सल्ला दिला होता. ''काही भटकत्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पुर्ण होत नाही आणि स्वप्नही अपुर्ण राहतात, त्या आत्मा भटकत राहतात. मग स्वत:च नाही झालं तर दुसऱ्याचं काम बिघडवतात. अशा भटकत्या आत्म्यांचा महाराष्ट्रही शिकार झाला आहे'', असे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच आजपासून 45 वर्षापूर्वी इथल्या एका महत्वाच्या नेत्याने आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाची सूरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या दिशेने गेला आहे. यामुळे अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पुर्ण करू शकली नाही आहेत. विरोधकांनाही यांनी अस्थिर केलं आहे. ही आत्मा त्यांच्या पक्षातही काहीही करते, कुटुंबातही सोडत नाही, असा हल्ला मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर चढवला आहे. 

हे ही वाचा : अजित पवारांच्या भावाचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच..'

या भटक्या आत्म्याने 1995 च्या भाजप-शिवसेनेच्या आघाडीच्या सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि 2019 मध्ये या नेत्याने जनादेशाचा अपमान केला होता, अशी टीकाही मोदींनी शरद पवारांवर केली आहे. पण आज महाराष्ट्रातच नाही तर देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न सूरू आहे, असा आरोप मोदींनी पवारांवर केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसने देशावर 60 वर्ष राज्य केलं. पण देशातील अर्ध्या जनतेला मुलभूत सुविधाही देऊ शकले नाही.आम्हाला फक्त 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या 10 वर्षात मुलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पुर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते पाहून चांगलं वाटलं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा. हे आधुनिक भारताचे चित्र आहे. महाष्ट्रातील जनतेला ही मोदींची गँरंटी आहे. तु्म्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करालं, असे आश्वासन मोदींनी यावेळी नागरीकांना दिलं. 

हे ही वाचा : 'ब्लेम गेम कशाला खेळता?', उदयनराजे भडकले..

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT