Raj Thackeray : “सेटलमेंट नीट होत नाही म्हणून…”, राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray first reaction dharavi redevelopment project to adani
Raj Thackeray first reaction dharavi redevelopment project to adani
social share
google news

– दिपेश त्रिपाठी, मुंबई

ADVERTISEMENT

Raj Thackeray on uddhav Thackeray protest against dharavi redevelopment project : धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून मुंबईतील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील (शिवसेना UBT, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार) पक्षासह काही संघटनांनी मोर्चा काढला. याच मोर्चावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उलट सवाल करत शंका उपस्थित केली आहे.

मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर बोलताना राज ठाकरेंना धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडीने मोर्चा काढला, मनसेची भूमिका काय, असा मुद्दा माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो परस्पर अदानीला का दिला, इथपासून त्याची सुरूवात होते. अदानींकडे असं काय आहे की, विमानतळ तेच हाताळू शकतात, कोळसा तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> Priya Singh Case : अखेर अश्वजित गायकवाडसह तिघांना बेड्या; पोलिसांची रात्री कारवाई

“मविआ”ला आजच का जाग आली?”

“एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही टाटांपासून सर्व कंपन्यांकडून टेंडर मागवायला हवी होती. डिझाईन मागवून घ्यायला हवं होतं. तिथं नेमंकं काय होणार आहे, हेही कळायला पाहिजे होतं. ते झालं नाही. मला फक्त इतकाच प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. अदानी ग्रुपचं कुणीतरी होतं, त्यांनाही म्हटलं होतं की, तुम्ही डिझाईन एकदा दाखवा. मला फक्त एवढाच प्रश्न आहे की, महाविकास आघाडीला आज का जाग आली?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> ट्रकखाली अडकलेल्या तरुणाचे CM शिंदेंनी वाचवले प्राण; काय घडलं?

“मोर्चाचा दबाव आणून सेटलमेंट…”

“हे जाहीर होऊन दहा महिने झाले असतील ना? आज का मोर्चा काढला… की, सेटलमेंट नीट होत नाही म्हणून… कशासाठी मोर्चा काढला? ही आघाडी आठ-दहा महिन्यांनी जागी झाली. यांनी विचारला का प्रश्न की तिकडे नेमकं काय होणार आहे? की, मोर्चाचा दबाव आणून सेटलमेंट करायची आहे. मला असं वाटतं की त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा”, असं म्हणत राज ठाकरेंनी कोंडी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT