महायुतीत भाजपकडून ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न! राजेंद्र गावितांचा गंभीर आरोप

माजी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशानंतर पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीत एकत्र असूनही भाजपकडून शिवसेनेचा ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न होत असल्याचे गावित यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

rajendra gavit alleges bjp trying to weaken shiv sena after shrinivas vanga joins bjp
राजेंद्र गावितांचा गंभीर आरोप
Google CTA

पालघर: महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी पालघरमधील एका राजकीय घडामोडीने मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालघरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेंद्र गावित यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये एकत्र असतानाही भाजपकडून शिवसेनेचा ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप गावित यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पालघरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

वनगांच्या भाजप प्रवेशावर गावितांची सावध प्रतिक्रिया

माजी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राजेंद्र गावित यांनी सुरुवातीला सावध भूमिका घेतली. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, इतकी वर्षे पदावर राहिल्यानंतर आता स्वार्थासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला असावा, असा टोला गावित यांनी वनगा यांना लगावला.

हे ही वाचा>> बंडावेळी शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले, पण त्याच माजी आमदाराने साथ सोडली! कोणत्या पक्षात केला प्रवेश?

वनगा यांच्या भाजप प्रवेशावर आपण फार काही बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी या निर्णयामागील राजकीय हेतूंवरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे वनगा यांच्या पक्षांतराकडे केवळ एका नेत्याच्या पक्षबदलाच्या रूपात न पाहता, पालघरमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

भाजपकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न?

या संपूर्ण प्रकरणात राजेंद्र गावित यांनी भाजपवर केलेला आरोप अधिक महत्त्वाचा ठरतो. पालघर जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर गावित यांनी भाजपला लक्ष्य केले. महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असतानाही भाजपकडून ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा>> सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?

गावित यांच्या या विधानाचा रोख भाजपच्या पालघरमधील राजकीय रणनीतीकडे असल्याचे दिसून येते. महायुतीमध्ये सत्तेसाठी एकत्र असलेल्या पक्षांमध्येच स्थानिक पातळीवर वर्चस्वाची लढाई सुरू आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

वनगांच्या प्रवेशामुळे पालघरच्या राजकारणात नवे समीकरण?

श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वनगा यांच्या निर्णयानंतर राजेंद्र गावित यांनी भाजपवर केलेल्या टीकेमुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत.

एकीकडे भाजपकडून पक्षविस्ताराचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडूनच नाराजी व्यक्त केली जात असल्याचे या प्रकरणातून दिसत आहे. त्यामुळे पालघरमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संबंध आगामी काळात कसे राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

वनगा यांच्या पक्षप्रवेशानंतर सुरू झालेला हा राजकीय वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता असून, महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.