Babanrao Lonikar : राजेश टोपेंची गाडी का फोडली? भाजप नेते लोणीकरांनी सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

rajesh tope car attack bjp babanrao lonikar tell the shocking reason jalna district central bank elections jalana
rajesh tope car attack bjp babanrao lonikar tell the shocking reason jalna district central bank elections jalana
social share
google news

Rajesh Tope Car Attack Babanrao Lonikar Reaction : इसरार चिश्ती, जालना : जिल्ह्यात आज जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (jalna district central bank elections)  पार पडली. या निवडणूकी दरम्यान शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची गाडी फोडल्याची घटना घडली. जिल्हा बँकेच्या कार्यालयाबाहेर हा सर्व प्रकार घड़ला होता. या घटनेनंतर राजेश टोपे दुसऱ्या गाडीने रवाना झाले होते. या संपूर्ण घटनेमागचं खरं कारण आता भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी सांगितले आहे. (rajesh tope car attack bjp babanrao lonikar tell the shocking reason jalna district central bank elections jalana)

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावर त्यानंतर माझ्या बंगल्यावरही बैठक पार पडली.या बैठकीला राजेश टोपे, मी आणि अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते. तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीत माझ्या विधानसभा मतदार संघाला व्हाईस चेअरमन पद आणि राजेश टोपेंच्या गटाला चेअरमन पद मिळावं असं ठरलं,असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : Sharad Pawar चा प्रफुल्ल पटेलांच्या वर्मावरच ‘बाण’! म्हणाले, “ईडीने घर का ताब्यात घेतलं?”

या सर्व गोष्टी ठरल्यानंतर राजेश टोपेंनी पलटी मारली. ऐनवेळेला दगाफटका केला आणि त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे गोड बोलून विश्वासघात केला,असा आरोप बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपेंवर केला.या घटनेनंतर माझ्या काही कार्यकर्त्यांनी राजेश टोपे यांना गाठून, तुम्ही आमचा विश्वासघात का केला? अशी विचारणा केली. यातून वादावादी झाली. यावेळी राजेश टोपे यांच्या ड्रायव्हरने आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घातली, असे माझ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यातून वाद आणखीणच वाढला. त्यातून हे प्रकरण घडलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP : ‘ज्यांना मोठं केलं त्यांनीच…’ शरद पवारांचा अजित ‘दादां’वर पलटवार

या घटनेमुळे जालना जिल्ह्याची बदनामी झाली आहे. अशा परिस्थितीत संघर्ष होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. आता त्यांना संघर्ष करायचं असेल तर त्यांना पोलिसात तक्रार द्यायची असेल, तर आम्ही अद्याप पोलिसात तक्रार दिली नाही. त्यांच्या गाडीची नुकसान भरपाई आम्ही करून देतो. पण त्यांना संघर्ष करायचा असेल किंवा रस्त्यावर लढाई करायची असेल. तर आम्ही देखील रस्त्यावरचेच कार्यकर्ते आहोत. पण आम्हाला संघर्ष करायचा नाही, जालना जिल्हा शातं राहायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT