Rajya sabha Election 2024 : भाजपचं पुन्हा धक्का! मुंडे, तावडेंना डच्चू; अशोक चव्हाणांसह तिघांना तिकीट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली.
Ashok chavan, medha kulkarni and ajit gopchade is candidates of bjp
social share
google news

Rajya Sabha Election Maharashtra bjp Candidate : महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेचा (शिंदे) उमेदवार जाहीर झाला आहे. त्यानंतर आता भाजपनेही पत्ते ओपन केले असून, तीन जणांना तिकीट दिलं आहे. यात पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अशोक चव्हाणांसह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातील सहापैकी तीन उमेदवार निवडून येतील इतकं संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे भजापने तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात अनेक वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मेधा कुलकर्णींचाही समावेश आहे. 

महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण यांच्याबद्दलचे वृत्त खरे ठरले आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. त्यांचे नावे जाहीर करण्यात आले असून, त्यांच्याबरोबरच नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अशोक चव्हाणांसह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवार

भाजपचं पुन्हा धक्कातंत्र

भाजप नेतृत्वाचं धक्कातंत्र यावेळी दिसून आलं. महाराष्ट्रातील तीन जागांसाठी ज्या नावांची चर्चा होती, त्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली गेली नाहीये. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. मात्र, या तिघांपैकी कुणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपने पुन्हा अनपेक्षित नावांना पुढे आणत धक्का दिला.

कोण आहेत अजित गोपछडे?

डॉ. गोपछडे हे नांदेडचे असून, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. ते एमडी डॉक्टर आहेत. अजित गोपछडे भाजप राज्य मेडीकल सेलचे प्रभारी आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जवळचा संबंध आहे. अजित गोपछडे हे लिंगायत समाजाचे आहेत. अजित गोपछेडे यांना 2020 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी घोषित झाली होती
पण, ऐनवेळी नाव बदलून रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

ADVERTISEMENT

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागा आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) यांच्याकडे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणता येईल इतके संख्याबळ आहे. तर भाजपकडे तीन उमेदवार जिंकतील इतके संख्याबळ आहे. भाजपकडून चार उमेदवार दिले जातील, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपकडून तीनच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT