राम मंदिर प्रतिष्ठापनेचं राज ठाकरेंना निमंत्रण, पण उद्धव ठाकरेंना नाही; समोर आलं कारण
भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरेंना सुनावले आहे. जे सातत्याने राम मंदिरावरून केंद्र सरकारवर टीका करतात, त्यांना का आमंत्रण द्यायच? जर खरंच यांच योगदान आहे तर ठाकरेंनी आणि राऊतांनी कारसेवा केल्याचा फोटो दाखवावा, असे आव्हानच गिरीष महाजन यांनी दिले आहे.
ADVERTISEMENT
Girish Mahajan Criticize Uddhav Thackeray On Ram Mandir : देशात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेची जोरदार तयारी सुरू आहे.या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी देशासह राज्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवले जात आहेत. हे निमंत्रण राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवण्यात आले आहे, पण ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठवण्यात आले नसल्याचा आरोप होतो आहे. यावर आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरेंना सुनावले आहे. जे सातत्याने राम मंदिरावरून केंद्र सरकारवर टीका करतात, त्यांना का आमंत्रण द्यायच? जर खरंच यांच योगदान आहे तर ठाकरेंनी आणि राऊतांनी कारसेवा केल्याचा फोटो दाखवावा, असे आव्हानच गिरीष महाजन यांनी दिले आहे. (ram mandir inauguration guest list raj thackeray invited and uddhav thackeray noy bjp girish mahajan says )
ADVERTISEMENT
मुंबईत गिरीश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पत्रकारांनी महाजनांना राज ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचा आणि ठाकरेंना नाकारल्याचा प्रश्न केला. केंद्र सरकारला जे व्हीव्हीआयपी वाटतात तेच या यादीत आहेत. म्हणून त्यांनी राज ठाकरेंना निमंत्रण दिले आहे आणि उद्धव ठाकरेंना नाकारल्याचे महाजन यांनी सांगितले.
हे ही वाचा : Virat Kohli शी पंगा घेणारा ‘हा’ खेळाडू IPL मधून ‘आऊट’, कारण…
राम मंदिर सोहळ्याचे कुणाला निमंत्रण द्यायचे हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. ठाकरेंना जरी ते व्हीव्हीआयपी वाटत असले तरी, केंद्र सरकारच्या दृष्टीने ते नाही आहेत, असा टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला. तसेच जे सातत्याने राम मंदिरावरून केंद्र सरकारवर टीका करतात, त्यांना आमंत्रण का द्यायचं? यासोबत संपूर्ण जनतेला, राज्याला, देशाला माहितीय उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे. जर खरंच त्यांच काही योगदान आहे, तर त्यांनी कारसेवा केल्याचा फोटो दाखवावा असे आव्हान देखील महाजनांनी दिले. तसेच घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्षात तिकडे जाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सर्वांना माहितीय कारसेवेच्या वेळेस काय झाले आणि कोणाच योगदान आहे, असे महाजन म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
मराठा आरक्षणाचा निर्णय़ लवकरच निकाली निघणार आहे. सुप्रीम कोर्टाने देखील आपल्यासाठी एक खिडकी ओपन केली आहे. क्युरेटीव्ह पेटीशनच्या माध्यमातून तिथेही आपला लवकरच निर्णय लागेल. आपण मागासवर्ग आयोग केला आहे, त्या संदर्भातील चौकशी महिन्याभरात पूर्ण होईल. त्यातून मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेल. महिनाभऱ संय़म ठेवा त्यामुळे समाजात द्वेश पसरेल अशी विधाने करू नये, असे आव्हान मी दोघांना केले असल्याचेही महाजन यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :Mumbai Crime : येरूणकरला फोटो स्टुडिओतच का घातल्या गोळ्या? गँगवारची Inside Story
मराठा आरक्षणावर एका महिन्याचा आत किंवा आणखीण 10 ते 15 दिवसात यावर निर्णय येईल. कारण आम्हाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे, असे नाही की आज दिले आणि कोर्टाने चार दिवसातचं रद्द केले, असे आरक्षण आम्हाला द्यायचेच नाही ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे महाजन यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT