Khadakwasla : ‘नानां’च्या उमेदवारीवरुन रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या, ‘अनेक अभिनेते आले, पण…’
खडकवासला मतदार संघ अनेक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. कारण आधी नाना पाटेकर यांच्या उमेदवारीवरून तर दुसऱ्यांदा रुपाली चाकणकर यांनीही त्याच मतदार संघातून इच्छा व्यक्त केल्याने खडकवासला चर्चेत तर आला आहेच मात्र चाकणकरांनीही आतापासूनच जय्यत तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
NCP Pune: खडकवासला मतदार संघातून अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांच्या नजरा आता त्या मतदारसंघाकडे वळल्या आहेत. त्यावरूनच आधी शरद पवारांना विचारण्यात आले होते. तर त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा खडकवासला मतदार संघ चर्चेत आला आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनाही त्याबाबत सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणूक म्हणजे स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोणीही येऊ शकते. निवडणूक लढवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यातच ही स्पर्धा असल्यामुळे आता आणि निवडणुकीत प्रतिस्पर्धक असल्याशिवायही ही निवडणूक लढविण्यात काही मजा नसल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले.
ADVERTISEMENT
अभिनेत्यांना किती पसंदी?
शरद पवार यांनी नाना पाटेकर यांच्याविषयी बोलल्यापासून खडकवासला मतदार संघ चर्चेत आला आहे. त्यातच आता रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदार संघातून इच्छा व्यक्त केल्याने या चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे त्यांना हे ही विचारण्यात आले आहे की नाना पाटेकर या निवडणुकीत असतील तर ही निवडणूक चुरशीची होणार का? असा सवाल केल्यानंतर त्यांनी सांगितले की, याआधीही राजकारणात नशीब अजमवण्यासाठी अभिनेते आले आहेत. मात्र त्यांना लोकांनी किती पसंदी दिली आहे. त्यामुळे राजकारणात आणि निवडणुकीत स्पर्धक असल्याशिवाय निवडणुकीही चुरशीची होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Pune : पुण्यात मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा! पोलिसांवर हात उगारला, सोसायटीत राडा…
नेत्यांवर पलटवार
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कधी शरद पवार गटातील नेत्यांकडून टीका केली जात तर कधी अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या नेत्यांवर पलटवार केला जात आहे. त्यावरूनही रुपाली चाकणकर यांना विचारले असता त्यांनी थेट खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.
हे वाचलं का?
भावनिकतेचं राजकारण
सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीच्या पवार गटातील जे दोन खासदार अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्या दोन खासदारांना अजित पवारांनीच निवडून आणले होते. त्यांनी आक्रोश मोर्चा घेतला असला तरी त्या मोर्चामध्ये रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही दिसत नव्हते, त्यामुळे सध्याच्या राजकारणात भावनिकतेचं राजकारण संपले असल्याचे सांगत त्यांनी कोल्हे आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
अजितदादांमुळे विजय
रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे या फक्त अजित पवारांमुळे निवडून आले आहेत. त्यांच्यामुळेच याआधी त्या फक्त निवडणुकीआधीच मतदार संघात जात होत्या. मात्र आता दहा महिने मतदार संघात तळ ठोकावा लागत असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> आधी नग्न केलं, मग धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं, थरारक घटनेत कसा वाचला महिलेचा जीव?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT