ममता बॅनर्जींना सर्वात मोठा झटका, सयानी घोष देखील बंडखोरांच्या यादीत सामील
Saayoni Ghosh : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, सयानी घोष यांच्यासह 20 खासदारांनी लोकसभेच्या सभापतींकडे वेगळ्या गटाला मान्यता देण्याची मागणी केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ममता बॅनर्जींना सर्वात मोठा झटका
सयानी घोष यांचाही वेगळ्या गटात सामीलो होण्याचा निर्णय
Saayoni Ghosh : पश्चिम बंगालमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून संसदेत आमच्या वेगळ्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत जादवपूरच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री सयानी घोष यांचे नाव समाविष्ट असल्याने ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पत्रात अभिषेक बॅनर्जी यांच्याऐवजी काकोली घोष दस्तीदार यांना टीएमसी संसदीय दलाचे नेते म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्षात अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.
सयानी घोष यांची राजकीय कारकीर्द
सयानी घोष यांची राजकीय कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये सामील झालेल्या सयानी यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही, त्यांनी हार न मानता राजकारणात सक्रिय राहणे पसंत केले. त्याच वर्षी त्रिपुरातील स्थानिक निवडणुकीदरम्यान 'खेला होबे' अशी घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. 2023 मध्ये टीएमसीच्या युवा विंगच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर, पश्चिम बंगालमधील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे त्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या होत्या.
हेही वाचा : आकांक्षाने प्रेमविवाह केला, कुटुंबियांनी एकत्र होऊन सूड उगवला!









