Sambhaji Bhide:’संभाजी भिंडेंचा अपमान सहन करणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sambhaji bhide controversial statement will not tolerate bhide's insult bjp mp anil bonde warns
sambhaji bhide controversial statement will not tolerate bhide's insult bjp mp anil bonde warns
social share
google news

Sambhaji bhide controversial statement : शिव प्रतिष्ठाणचे संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. भिडेंच्या या विधानावरून राज्यभर संतापाची लाट पसरली होती. कॉंग्रेस नेत्यांनी तर भिडेंवर सडकून टीका करत कारवाईची मागणी केली होती. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील राज्य सरकार उचित कारवाई करेल असे आश्वासन दिले आहे. असे असतानाच आता संभाजी भिंडेंचा अपमान सहन केला जाणार नाही, एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे विधान भाजप खासदार डॉ अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (sambhaji bhide controversial statement will not tolerate bhide’s insult bjp mp anil bonde warns)

अनिल बोंडे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे गुरूजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, मात्र एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे विधान अनिल बोंडे यांनी केले आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी भारत माता की जय म्हणणार नाही असे जाहिरपणे बोलतात.नवाब मलिक देखील सर्वाना ठाऊक आहेत. पण या दोघांबद्दल आमदार यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद असते आणि भिडे गुरूजींचा मात्र त्या अपमान करतात, हे आम्हाला अजिबात सहन होणार नाही, असे बोंडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : ‘स्वत:चे चरित्रही तपासायची हिंमत ठेवा’, संजय राऊत PM मोदींना असं का म्हणाले?

भिडे गुरूजींना यशोमती ठाकूर यांनी हरामखोर, नालायक म्हटले आहे. मात्र गुरुजींना अशा शब्दात बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही आहे. त्यामुळे शेकडो युवकांच्या भावना भडकावल्या आणि समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा असे अनिल बोंडे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांचे स्वतःची संघटना चालवतात, याला जाणीवपूर्व राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्यावेळी त्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे पण ते करत नाही. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही”,असं देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर बोलताना म्हणाले आहेत. तसेच “या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे, ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो… कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

हे ही वाचा : Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT