Mumbai North west Lok sabha : "वायकरांच्या निकालात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात"

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून प्रचंड वाद सुरू झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी, खासदार रवींद्र वायकर आणि खासदार संजय राऊत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल वाद

point

रवींद्र वायकर यांच्या विजयावरून विरोधकांचे प्रश्न

point

संजय राऊत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांच्यावर आरोप

Sanjay Raut on Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकालावरून प्रचंड वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून खुलासा करण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात असून, खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. (Sanjay Raut's serious allegations against returning officer Vandana Suryavanshi)

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सातारकर यांचे नाव घेत राऊतांनी काही स्फोटक दावे केले आहेत. 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाबद्दल संजय राऊत काय काय बोलले?

संजय राऊत म्हणाले, "उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल हा या देशातील संपूर्ण निकाल प्रक्रियेतील घोटाळ्यातील एक आदर्श घोटाळा आहे. भाजपने आणि त्यांच्या बरोबरच्या टोळ्यांनी देशभरात कशा पद्धतीने विजय मिळवला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा निकाल आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> वायकरांचा विजय वादात, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय? 

खासदार संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, 

देशभरातील चित्र शेवटच्या क्षणी जिथे पाचशे ते चार हजार या फरकात जय-पराजयाचे चित्र दिसत होते. तिथे यंत्रणा ताब्यात घेऊन अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले. कीर्तिकरांना विजयी घोषित केले होते. तरीही दोन तास फेरमतमोजणी करून त्यांच्याविरुद्ध निकाल देण्यात आला.

वंदना सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप

राऊतांनी असा आरोप केला आहे की, "रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा यामध्ये मोठा हात आहे. त्या आता जे खुलासे करताहेत तांत्रिक, तो त्यांचा प्रांत नाही. तसं असेल तर एलन मस्कने वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी. या क्षेत्रातील सर्वात मोठा माणूस एलन मस्क सांगतोय की, ईव्हीएम हॅक होऊ शकते. मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकते."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपसाठी गडचिरोली विधानसभा जिंकणे अवघड? काँग्रेसची स्थिती काय? 

"उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या पूर्वेइतिहास तपासून घेतला पाहिजे. सीसीटीव्ही फूटेज का दिले जात नाही? त्यांना कुणाचे फोन या काळात आले? वंदना सूर्यवंशींचा फोनही ताब्यात घेतला पाहिजे. त्यांचा सगळा स्टाफ, त्याचबरोबर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन, जे आतमध्ये फिरत होते. अधिकाऱ्यांचे फोन जे उद्योग चालले होते", असे राऊत यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

सातारकर कोण?

राऊतांनी पुढे म्हटले आहे की, "तो फोन वनराई पोलिसांनी जप्त केल्यावर वायकरांच्या जवळचा माणूस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्याने चार दिवस वनराई पोलीस ठाण्यात का येरझारा घालत होता? फोन बदलायचा होता, काही डील करायचे होते? ते डील झाले की नाही, याचा तपास व्हायला पाहिजे."

हेही वाचा >> निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो- माजी निवडणूक अधिकारी 

"वनराई पोलीस ठाण्यात फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झाला का? हे सातारकर कोण आहेत, कुणाचे नातेवाईक आहेत? त्याचे पोलीस ठाण्यात काय काम होते? त्यांचे काय डील झाले हे सांगा, नाहीतर मी सांगतो. हा संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने रवींद्र वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे. जोपर्यंत संशय दूर होत नाही, तोपर्यंत वायकर यांना शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे", अशी मागणी राऊत यांनी केली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT