संजय शिरसाटांना क्लीनचिट? सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांची वकिलीच काढली

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sushma Andhare criticize Devendra fadnavis : शिवसेना आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांना सुषमा अंधारे (sushama andhare) यांनी दाखल केलेल्या प्रकरणात क्लीनचिट मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याला महिला आयोगाने फेटाळले आहे. आता या दाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस वकिलीच आयकार्ड दाखवता, तर आमदाराला ही क्लीनचिट कशी दिलीय? वकील म्हणून फडणवीस मार्गदर्शन करतील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. (sanjay shirsat clean cheat case sushama andhare criticize devendra fadnavis and shinde government)

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजी नगरच्या एका आमदाराने जी असभ्य आणि सवंग भाषा केली होती. ती भाषा स्त्री मनास लज्जा आणणारी होती. या भाषेचे अनेक फुटेज पब्लिकमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे एकीकडे शीतल म्हात्रे प्रकरणात ओरीजनल व्हिडिओ दाखवता येत नसताना देखील गुन्हे दाखल होतात, आणि दुसरीकडे ओरीजनल व्हिडिओ दाखवून सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत,अशी खंत सुषमा अंधारे (sushama andhare) यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : ‘सत्य समोर यायला हवे’, भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी मोदी सरकारला सुनावलं

देवेंद्र फडणवीसांवर चढवला हल्ला

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपण वकिलीच आयकार्ड दाखवता.त्यामुळे गृहमंत्री फडणवीस कदाचीत सत्तेच्या बाजूने बोलतील, पण वकील फडणवीस मला फॅक्ट सांगतील,असा टोला मारत सुषमा अंधारे (sushama andhare) यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार केला. एसआयटी नेमली असताना पोलीस अधिकारी एकांगी चौकशी करतात का? या चौकशीत आरोपी आणि फिर्यादी या दोघांचे म्हणणे ऐकावे लागते. त्यामुळे कोणता अधिकारी नेमला होता? महिला किंवा पुरूष होता? पीआय, एपीआय़, डीवायएसपी लेवलच्या क्लासचा अधिकारी होता का? तो माहित करून घेण्याचा मला अधिकार आहे की नाही, हे वकील फड़वणीसांनी मला सांगावे? आमदाराला क्लीन चीट कशी दिली? वकील म्हणून तुम्ही मार्गदर्शन कराल का?, असा खडा सवाल अंधारे यांनी फडणवीसांना केला.

हे वाचलं का?

एसआयटी चौकशी नेमल्यानंतर फिर्यादीला समिती नेमलेली आहे, या समितीत कोणते अधिकारी आहेत, असे कळवण्याचे सौजन्य, औदार्य, प्रक्रिया,अनौपचारीकता, औपरचारीकता असते. पण मला कोण अधिकारी हे का कळवलं गेलं नाही. माझं म्हणणं मांडण्यासाठी एकदाही का बोलावल नाही? मला कुठल्याची पोलिस स्टेशनमधून किंवा अधिकाऱ्यांनी बोलावलं नाही? माझ्या व्हाट्सअॅपला तरी नोटीस पाठवली आहे का, मला हजर राहण्याचे आदेश पाठवला आहे का? असे अनेक सवाल अंधारे यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच दिल्लीत ज्या महिला खेळाडू न्यायासाठी लढतायत, आणि इकडे मी न्यायासाठी लढतेय. याचा अर्थ एकूण कुठल्याच महिलेबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाहीत आहात का? या सर्वांची उत्तरे फडणवीस यांनी वकिल म्हणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

हे ही वाचा : अजित पवार, जयंत पाटलांच्या सोलापूर दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी दिला झटका

या प्रकरणात जर सर्व एकांगीच करणार होतात, तर चौकशीचे नाटकच कशासाठी केले, इतका कायद्याला हरताळा फासावा, कायद्याची नियमावलीच धाब्याबर बसावी, इतरा निगरगट्टपणा शासन प्रक्रियेत कसा येतो,अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली. तसेच तुम्ही ठरवून निव्वळ तुमचा सत्तेचा पट चालवण्यासाठी, कितीही वाह्यातपणा करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांना सांभाळून घ्य़ायचे ठरवले आहात का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मी कोर्टाची लढाई लढत राहिन आणि कोर्ट मला न्याय देईल अशी मला आशा असल्याचा विश्वास व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT