Santosh Deshmukh Murder: धनंजय मुंडेंनी थेट केली फाशीची मागणी, वाल्मिक कराडबद्दल काय म्हणाले?
Dhananjay Munde: मागील दोन दिवसांपासून मीडियाच्या समोर न आलेल्या धनंजय मुंडेंनी अखेर आज मीडियासमोर येत वाल्मिक कराडबाबत आणि त्यांच्या स्वत:वर होणाऱ्या आरोपांबाबत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल
संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेच्या मागणी
धनंजय मुंडे अखेर आले समोर
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावरून सध्या विरोधक रान उठवत आहेत. अशातच आज (20 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना थेट वाल्मिक कराडचं नाव घेत मास्टर माईंडवर कारवाई केली जाईल असं विधान केलं. याचवेळी विरोधकांनी आता थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशावेळी मागील दोन दिवसांपासून सभागृह आणि माध्यमांसमोर न आलेले धनंजय मुंडे हे मात्र आज मीडियासमोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहातच धनंजय मुंडें यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांसारखे मुख्यमंत्री असताना या प्रकरणाची निष्पक्ष कारवाईची त्यांनी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis : "दादागिरी खपवून घेतली जणार नाही...", 'त्या' प्रकरणावरून भर सभागृहात फडणवीस संतापले
दरम्यान, आता या सगळ्या आरोपांना धनंजय मुंडेंनी स्वत: आज उत्तर दिलं आहे. पाहा धनंजय मुंडे नेमंक काय म्हणाले.
संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे - धनंजय मुंडे
'मी सुरुवातीपासून म्हणतोय की, हे व्यवहारातून झालेलं भांडण आहे. ज्यामधून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली आहे. अशाप्रकारे हत्या झाली आहे की, ज्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच आरोपी हे अटक झाले आहेत. जेवढी तीव्र भावना ही आमची सर्वांचीच होती. त्यात आरोपी अटक झाले आहेत, एसआयटी नेमली आहे. आता यामध्ये शेवटपर्यंत तपास होईल.'










