शरद पवारांचं केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीबद्दल मोठं विधान; म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP president sharad pawar what said about KCR's Bharat rashtra samiti
NCP president sharad pawar what said about KCR's Bharat rashtra samiti
social share
google news

Maharashtra Politics, KCR News : महाराष्ट्रात राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. पण, सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे, ते तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पार्टीची. केसी राव महाराष्ट्रात पक्षाचा झपाट्याने विस्तार करताना दिसत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही गळ टाकला आहे. त्यामुळे केसी राव यांचे महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरणार का याची चर्चा सुरू आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केले आहे.

ADVERTISEMENT

अमळनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’, या जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना युतीमधील संबंध प्रथमच ताणल्या गेल्याचे दिसून आले. यानंतर शिवसेनेकडून आणखी एक जाहिरात देऊन भाजपची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. या जाहिरात राजकारणावर बोलताना शरद पवार म्हणाले,”शिंदेंच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. प्रिंट मीडियाच्या दृष्टीने त्यांची जाहिरातबाजी फायद्याची आहे एवढं आम्ही बघतो.”

‘बीआरएस बी टीम?’ शरद पवार नेमकं काय बोलले?

केसी राव यांचा पक्ष महाराष्ट्रात जोरात प्रचार मोहीम राबवताना दिसत आहे, आगामी काळात याचा सत्ताधाऱ्यांना बसेल की, विरोधकांना… तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख करत मोठं विधान केले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Manipur Violence, RK Ranjan Singh : भयंकर! केंद्रीय मंत्र्याचे घर जाळले

शरद पवार म्हणाले, “असं आहे की, मागची निवडणूक तुम्ही आठवली तर आम्हाला थोडं नुकसान सहन करावं लागलं. ते नुकसान वंचितच्या वतीने त्यांनी जी काही मते वळवली त्यामुळे झाले. आज असं दिसतंय की… लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. मी नाही म्हणत नाही. कुणालाही कुठेही जाऊन काम करायचा अधिकार आहे.

हेही वाचा >> ‘बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद ‘, शिंदे-फडणवीसांतील सुप्त संघर्षावर शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य

महाराष्ट्रावर काय परिणाम होऊल हे बघितलं तर माहिती नाही. काही वेळेला राजकारणात स्वतः लढायचं असतं. आणि दुसरं एक दोन टीम तयार करायच्या असतात, पायात पाय घालण्यासाठी… त्याला साधारणतः राजकारणातील बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की काय, हे आता कळेल.

ADVERTISEMENT

रावेर लोकसभा मतदारसंघ कुणाकडे?

“त्याची चर्चा अद्याप आम्ही केलेली नाही. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ सहकारी आपापसात चर्चा करत आहोत. ती झाल्यानंतर आम्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बसणार आहोत. त्यानंतर हे चित्र मांडू. जिथे आम्ही लढू शकतो, असे लोक आमच्याकडे आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT