NCP : शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेंज, 'केंद्र सरकारने समिती नेमून राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
Sharad pawar direct challenge to PM Narendra Modi : शरद पवार (Sharad pawar) यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच चँलेज केले आहे. 'जर मी भ्रष्टाचार केला असेल तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी', असे थेट आव्हानच पवारांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) दिले आहे.
ADVERTISEMENT
Sharad pawar direct challenge to PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका मुरबाडमधील एका सभेत केली होती. या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच चँलेज केले आहे. 'जर मी भ्रष्टाचार केला असेल तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी', असे थेट आव्हानच पवारांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) दिले आहे. (sharad pawar direct challenge to pm narendra modi on ncp curruption pune maha vikas aghadi india alliance meeting)
ADVERTISEMENT
पुण्यात महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीची आज जाहीर सभा पार पडली. या सभेतून बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. तसेच शरद पवारांनी मोदींना राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याचे आव्हान दिले आहे.
हे ही वाचा : Sanjay Gaikwad : शिंदेंच्या आमदारावर गुन्हा दाखल
शरद पवार काय म्हणाले?
जाहीर सभेतून बोलताना शरद पवार म्हणाले, 'मोदी साहेबांनी मुरबाडच्या भाषणात सांगितलं, या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे. हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहारात, पाटबंधारे विभाग आणि पाणी योजनांमध्ये केला.' माझं त्यांना आव्हान आहे, जर मी भ्रष्टाचार केला असेन तर केंद्र सरकारने समिती नेमावी. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी आणि अहवाल देशासमोर ठेवावी. या भ्रष्टाचारात जो कोणी दोषी असेल त्याच्याविरोधात कठोर धोरण तुम्हाला आखायचे असेल तर त्याला आमचा पुर्ण पाठिंबा असेल, असे थेट आव्हानच शरद पवारांनी मोदींना दिले आहे.
हे वाचलं का?
शरद पवारांचा मोदींवर हल्ला
शरद पवार पुढे म्हणाले, गेल्या आठ-दहा वर्षात मोदी साहेबांच राज्य आलं. एक अजब पंतप्रधान आपण या देशात पाहिला. त्यांची सगळे धोरणे पाहिलीत तर गेल्या अनेक वर्ष या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला, त्यांच्याबद्दल जनतेमध्ये घृणा कशी करावी, त्यांना रस्त्यावर कसे आणता येईल. हा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडून सुरु असल्याची टीका शरद पवारांनी मोदींवर केली.
हे ही वाचा : Manoj Jarange : 'लोणावळ्याच्या बंगल्यात काय डील झाली?'
मोदींची अलिकडची भाषण पाहिलीत तर..जवाहर लाल नेहरू, ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व दिलं, स्वातंत्र्यासाठी आयुष्याच्या 8-10 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात काढला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात संसदीय लोकशाही मजबूत केली. आधुनिक ज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीने हा देश योग्य दिशेने कसे जाईल हे महत्वाचे काम त्यांनी केले. विज्ञानाच्या आधाराने अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या दिशेने नेला. सगळं जग हे मान्य करते आहे, पण मोदी साहेब काय मान्य करायला तयार नाही, त्यांना माईक हातात मिळाला की नेहरूंवर टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो, असा हल्ला देखील शरद पवारांनी मोदींवर चढवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT