Sanjay Gaikwad : शिंदेंच्या आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Gaikwad Hunted Tiger, Buldhana Forest Department : संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर केलेल्या या विधानाची क्लिप बुलढाणा वनविभागाच्या हाती येताच ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुलढाणा आरएफओने आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील दात जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Gaikwad Hunted Tiger, Buldhana Forest Department : जका खान, बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी एका वाघाची शिकार केली होती. ही शिकार केल्यानंतर त्यांनी वाघाचा दात काढून गळ्यात लॉकेट सारखा लटकवला होता. या संबंधित माहिती गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) स्वत:हूनच माध्यमांना दिली होती. त्यानंतर आता वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आलं असून त्यांनी वाघाचा दात जप्त करून तज्ञ समितीकडे तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. (sanjay gaikwad hunted tiger and tiger tooth use like neck locket buldhana forest department action mode buldhana news)
ADVERTISEMENT
शिवजयंती निमित्त बुलढाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी संजय गायकवाड यांनी, 'मी 1987 मध्ये एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला होता'. यावर गायकवाडांना विचारण्यात आले की तो वाघ होता की बिबट्या? त्यावर गायकवाड म्हणाले, 'वाघाची शिकार केली होती, बिबट्या वगैरेंना तर मी असचं पळवून लावत होतो'.'
हे ही वाचा : MNS: राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय?
संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर केलेल्या या विधानाची क्लिप बुलढाणा वनविभागाच्या हाती येताच ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुलढाणा आरएफओने आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील दात जप्त केला आहे. तसेच वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच हा दात न्यायवैद्यकीय तपासणीसाठी तज्ञ संस्थेकडे पाठवण्यात येत आला आहे. या संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बुलढाणा वन विभागाने सांगितले आहे.
हे वाचलं का?
डेहराडूनला दात तपासणीसाठी पाठवणार
दरम्यान वाघ, सिंह, बिबट्या किंवा इतर कोणत्याही वन्य प्राण्याचे अंग दागिने म्हणून परिधान करणे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे बुलढाणा आरएफओने आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील दागिने जप्त केले आहेत. हा दात सिंहाचा आहे की इतर कोणत्याही प्राण्याचा आहे, हे शोधण्यासाठी तो डेहराडून येथील वाइल्ड लाइफ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. हा दात वाघाचा असल्याचे निष्पन्न झाल्यास शिकारीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बुलढाणा वनविभागाचे आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Nanded : अशोक चव्हाणांनी काँग्रेसला दिला मोठा हादरा
दरम्यान याप्रकरणी वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा दात न्यायवैद्यकीय तपासणीसाठी तज्ञ संस्थेकडे पाठवण्यात येत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बुलढाणा वनविभागाने सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT