Breaking: Sharad Pawar यांच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह, पाहा कोणत्या चिन्हावर लढणार पवारांचे शिलेदार
Sharad pawar ncp group get new party symbol : अखेर आता शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणूकीत शरद पवार गट तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT
Sharad pawar ncp group get new party symbol : केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला खरी राष्ट्रवादी असल्याची मान्यता दिली होती. त्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' असे नाव दिले होते. यानंतर शरद पवार गटाचे नेमकं चिन्ह काय असणार अशी चर्चा होती. पण अखेर आता शरद पवार गटाला तुतारी (तुतारी फुकणारा माणूस) हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणूकीत शरद पवार गट तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवताना दिसणार आहे. ( sharad pawar ncp grop get new party symbol tutari election commision of india ncp politics ajit pawar ncp)
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ट्विट जसंच्या तसं
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pankaja Munde: बीड लोकसभा निवडणुकीबाबत पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर पवारांना मिळालं चिन्ह
दरम्यान शरद पवार गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नाव दिलं होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shilpa Bodkhe : 'ठाकरेंच्या शब्दाला किंमत नाही...'
तसंच पक्षाला चिन्ह देण्याबाबत देखील कोर्टाने निर्देश दिले होते. 'ज्यावेळी चिन्हासाठी शरद पवार यांचा पक्ष मागणी करेल त्यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला एक आठवड्याच्या आत ते चिन्ह द्यावं असे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवारांच्या पक्षाला दिलं आहे.
सुप्रीम कोर्टात पक्षाच्या नावासाठी काय केला होता युक्तिवाद?
वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी चिन्ह आणि पक्षाबाबत जो युक्तिवाद केला होता त्यात असं म्हटलं होतं की, 'आगामी काळात होणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणूक आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्यात यावं, कारण पक्ष आणि चिन्हाशिवाय कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT