शरद पवार राजीनाम्यावर ठाम,राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून मनधरणी सुरुच

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar political retirement
sharad pawar political retirement
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार झाले. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अगदी रडून पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली.मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. या घटनेला दोन दिवस उलटून देखील पवार आपल्या भूमिकेवर जैसे थेच आहेत. त्यामुळे शरद पवार राजीनाम्यावर ठाम असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. अशात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवारांची मनधरणी सूरूच आहे. त्यामुळे आता शरद पवार राजीनामा मागे घेणार की निर्णयावर ठाम राहणार? हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे. (sharad pawar political retirement ncp big leaders demand withdrawal of resignation)

ADVERTISEMENT

तुम्हीच आमची कमिटी, तुम्हीच सर्व काही…

शरद पवारांची (sharad pawar) मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अनेक प्रयत्न करत आहेत.जितेंद्र आव्हाडांनी तर राजीनामाच दिला आहे. त्यातही नेत्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. छगन भूजबळ यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहेत. साहेब, आज या पक्षाला, राज्याला आणि देशाला सुद्धा तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे तुमचा हा निर्णय़ आम्हालाच काय, देशातल्या कोणत्याही व्यक्तीला मान्य नाही. तुम्हाला विनंती आहे की हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी भूजबळ यांनी केली. कमिटी वगैरे आम्हाला काही मंजूर नाही, तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी आणि तुम्हीच सर्व काही, असे देखील भूजबळ म्हणाले.

हे ही वाचा : कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

सेनापतीला सैन्याच्या आग्रहाखातर मैदानात रहावं लागेल…

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ट्विट करून शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. साहेब राजीनाम्यावर ठाम आहेत तर आम्ही त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यावर ठाम आहोत असे जितेंद्र आव्हाड म्हणतात. साहेबांच्या भाषणातील एक वाक्य मला आठवलं की, सामुदायिक शक्तीचा नेहमी विजय होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय कार्यकर्ता साहेबांच्या राजीनाम्यामुळे व्यथित आहे आहे. युद्ध समोर आहे आणि सेनापती नाही. ‘युद्ध जिंकता येत नाही’. त्यामुळे सेनापतीला सैन्याच्या आग्रहाखातर मैदानात रहावं लागेल, असे ट्वीट करून आव्हाडांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

शरद पवार कार्यकर्त्यांना काय म्हणाले?

‘पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्या तुमच्या रुपाने व्यक्त होत आहेत. कालही व्यक्त झाली.. आजही तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं की, तुम्ही काही फक्त मुंबईतून आलात असं नाही. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आला आहात. मी जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. पुढे पक्षाचं काम कसं चालावं.’

ADVERTISEMENT

‘ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकाऱ्यांसोबत विचार-विनिमय करण्याची आवश्यकता असते. मी त्याचा विचार केला. पण मला एक खात्री होती की, तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणाला नसता.’ असे शरद पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT