‘…तर तुम्ही स्वतः कोणती शिक्षा भोगणार’, शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ncp Jalgaon sabha : Sharad Pawar attacked on pm Narendra modi.
Ncp Jalgaon sabha : Sharad Pawar attacked on pm Narendra modi.
social share
google news

Sharad Pawar speech Jalgaon : जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. शरद पवारांनी मोदींना आव्हान दिलं. त्याचबरोबर आरोप खोटे ठरले, तर तुम्ही स्वतः कोणती शिक्षा भोगणार, असे टीकास्त्र पवारांनी डागलं. (Sharad Pawar Hits out at PM Narendra Modi over corruption allegations)

ADVERTISEMENT

शरद पवार म्हणाले, “आजकाल चित्र काय दिसतंय… मोदी साहेबांचं राज्य आहे. 9 वर्षे झाली मोदी साहेबांनी काय केलं? इथं राष्ट्रीय पक्ष फोडणे… शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली. फोडाफोडीचे राज्य, तेवढी एकच गोष्ट यांनी केली. दुसऱ्या बाजूला आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी ईडी, सीबीआय… खोटे खटले भर… ज्याचा उल्लेख अनिल देशमुखांनी केला.”

हेही वाचा >> Maratha Morcha : लाठीमाराचा मुद्दा… पवारांचा चढला पारा; म्हणाले, ‘राजकारण सोडेन’

“काही संबंध नसताना एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला तुरुंगात टाकायचं काम केलं. नवाब मलिक जुने नेते. त्यांनाही तुरुंगात टाकलं. अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता कसे येईल, यासाठी वापरायच्याऐवजी त्या सत्तेचा गैरवापर भाजपवाल्यांनी केला आहे.”

मोदींवर टीकास्त्र, शरद पवार जळगावच्या सभेत काय बोलले?

देशाचे पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. इथे भ्रष्ट लोक आहेत, असे ते म्हणाले. मोदींना माझं सांगणं आहे की, ज्यांनी चुकीचं काम केलं, त्यांच्याविरुद्ध तुम्ही खटला भरा. चौकशी करा. ते जर खोटं ठरलं, तर त्यांची शिक्षा तुम्ही स्वतः काय घेणार? हे देशाला सांगा. खोटे आरोप करणे देशहिताचे नाही”, असा घणाघात पवारांनी मोदींवर केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> India Rename as Bharat : मोदी सरकारला इंडिया नाव बदलण्यासाठी काय करावं लागेल?

“दोन दिवसापूर्वी आम्ही जालन्याला गेलो. तिथे काही कारण नसताना लाठीहल्ला केला. स्त्रिया जखमी झाल्या. माणसं जखमी झाली. लहान मुलं जखमी झाली. त्याचा परिणाम महाराष्ट्रात झालाय. सत्तेचा गैरवापर करून शेतकरी, महिलांवर लाठीहल्ला करण्याची नीती ज्यांची असेल, त्यांच्या हातात आम्ही सत्ता ठेवणार नाही. संधी मिळेल तेव्हा शंभर टक्के पराभव करू, हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आपण तयार राहीलं पाहिजे”, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT