शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar reprimanded Girish Mahajan : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने केलेल्या भाषणात शरद पवारांनी मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलंय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावलं
नेमकं काय घडलं?
Sharad Pawar, मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. शरद पवार यांनी यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजनांना त्यांच्या पंजाबमधील भाषणावरुन सुनावलंय. गिरीश महाजन काय म्हणाले होते? आता शरद पवारांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.. ॉ
हेही वाचा : जालना : वडिलांच्या मित्राकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 'नको तेच', चार महिन्यांपूर्वी..
गिरीश महाजन काय म्हणाले होते?
गिरीश महाजन पंजाबमधील भाषणात म्हणाले,"6 जून 1984 हा काळा दिवस आपण कधी विसरु शकत नाहीत. आपले हजारो बहीण-भाऊ शहीद झाले. मारले गेले. आपल्या पवित्र धर्मस्थळावर सैन्याचं आक्रमण झालं, असंच मी म्हणेन. इंदिराजींनी सैन्याला जबरदस्तीने आपल्या पवित्र धर्मस्थळामध्ये घुसवलं. त्यानंतर क्रूरपणे आपल्या लोकांचे खून झाले. अब्दाली आल्यानंतर त्याने आपल्या अनेक बहीण-भावांना शहीद केले होते. त्याच प्रमाणे आपल्याच देशात आपल्याच पंतप्रधानांनी आपली वाईट अवस्था केली होती. एवढे खून होऊनही कोणाला शिक्षा झाली नाही, याचं दु:ख आहे."
हेही वाचा : आकांक्षाने प्रेमविवाह केला, कुटुंबियांनी एकत्र होऊन सूड उगवला!









