NCP: भुजबळ म्हणाले बडव्यांनी घेरलं, अमोल कोल्हेंचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar vs ajit pawar amol kolhe reply chhagan bhujbal maharashtra politics
sharad pawar vs ajit pawar amol kolhe reply chhagan bhujbal maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political latest News : साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा, असे विधान अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले होते. भुजबळ यांच्या या विधानाचा आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला आहे. आज अनेकजण म्हणतात, ”आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं, पण या महाभागांना पंढरीचा पांडूरंगच समजलाच नाही, असा पलटवार आता अमोल कोल्हे यांनी केला आहे. वाय.बी.सेंटरमध्ये शरद पवार यांच्या सुरु असलेल्या बैठकीत अमोल कोल्हे बोलत होते. (sharad pawar vs ajit pawar amol kolhe reply chhagan bhujbal maharashtra politics)

2019 सालची निवडणूक पावसाच्या एका सभेने बदलली असे सर्व म्हणतात, पण हे अर्धसत्य आहे. कारण पावसातल्या सभेत जो सह्यांद्री उभा होता, त्या सह्याद्रीच्या 55 वर्षाच्या कारकिर्दीने निवड़णूकीचा निकाल बदलल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच पावसात भिजून सभा होत नाही, इतिहास घडत नाही, पावसात भिजणारी ही व्यक्ती 55 वर्ष महाराष्ट्राच्या लढ्यासाठी लढते, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी झिजते. हा विश्वास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. हाच विश्वास जागवण्यासाठी आपण साहेबांच्या साथीने कटीबद्ध होऊयात असे देखील कोल्हे यांनी सांगितले. तसेच असे म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला की मातीचा चिखल होतो,आणि ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला लगावला.

हे ही वाचा :Maharashtra Politics : बंडानंतर छगन भुजबळांचा शरद पवार, जयंत पाटलांवर घणाघात

साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या, अशी माझी विनंती आहे असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी केले होते. या विधानावर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज अनेकजण म्हणत असतील आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं, मला वाटत या महाभागांना पंढरीचा पांडूरंगच समजलाच नाही, अशी टीका त्यांनी भुजबळ यांच्यावर केली. तसेच कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या संत सावतामाळींच्या हृदयात देखील पाडूरंग होता. गोरा कुंभाऱाच्या कामात सुद्धा पाडूरंग होता. जर मनातून निस्सीम भक्ती केली असती, तर पाडूरंग पावला असता. विनाकारण बडव्यांचे कारण देण्याचा प्रयत्न का करावा याच विषयी संभ्रम असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2019 साली ही परिस्थिती उद्भवली होती, कित्येक सहकारी सोडून जात होते, त्यावेळी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान एकच गोष्ट पाहिली. या महाराष्ट्राच्या तरूणाईचा शरद पवांरांवर असलेला विश्वास, हीच गोष्ट करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. हा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, मान खाली घालणाऱ्यांची नाही, तर लढणाऱ्यांची आहे.हे पुढच्या काळात दाखवून देऊ, असे आव्हान देखील अजित पवार गटाला दिले.

हे ही वाचा : शरद पवारांचं पारडं जड की, अजित पवाराचं; कुणाकडे किती आमदार? नावं आली समोर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT