Shiv Sena : बाळासाहेबांनी शिंदेंना दिला धनुष्य-बाण; शिवजयंतीदिनी विशेष देखावा
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे डोंबिवलीमध्ये एक विशेष देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात एका बाजूला भवानी माता भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना देत आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देत आहेत. तसंच धर्मवीर आनंद दिघे आशीर्वाद देत आहेत, असंही या देखाव्यात दाखवण्यात आलं आहे. शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने हा देखावा […]
ADVERTISEMENT

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे डोंबिवलीमध्ये एक विशेष देखावा साकारण्यात आला आहे.
या देखाव्यात एका बाजूला भवानी माता भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना देत आहे.
तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देत आहेत.
तसंच धर्मवीर आनंद दिघे आशीर्वाद देत आहेत, असंही या देखाव्यात दाखवण्यात आलं आहे.
शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला आहे.
३५० वर्षांनंतर आज पुन्हा तसाच योग जुळून आल्याचा संदेश या देखाव्यातून दिल्याची चर्चा आहे.