Lok Sabha 2024 : “अजित पवारांना इतक्या जागा देणं शक्य नाही”, महायुतीत नवा पेच
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार गटाला २२ जागा देण्यास विरोध केला आहे. तुमाने यांनी भुजबळ यांनी केलेल्या मागणीला प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Ajit Pawar eknath shinde bjp : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करत असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्न करत आहेत. महायुतीत जागावाटपावरून कुरबुरी होताना दिसत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे केले जात असताना आता जागावाटपवरून शिंदेंच्या खासदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा द्यायला हव्यात याबद्दल मोठं विधान केले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. आता महायुतीमध्ये सुरूवातीला शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष होते, तर इतर छोटे मित्रपक्षही आहेत. पण, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट महायुतीत सामील झाला. त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा वाढलेला आहे. अजित पवार गटाकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. तशी भूमिका छगन भुजबळ यांच्याकडून मांडली गेली. त्याला उत्तर शिंदे गटाच्या खासदाराने स्पष्ट भाषेत उत्तर दिले.
अजित पवारांना २२ जागा देणं अशक्य -कृपाल तुमाने
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी २२ जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने गेल्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा लढवल्या होत्या. २२ जागा या निवडणुकीत आम्हाला हव्या आहेत. आमचे सध्या १३ खासदार असले, तरी १८ खासदार निवडून आले होते, पण २२ जागा आम्ही लढलो होतो, त्यामुळे आमची मागणी २२ जागांचीच आहे, अशी भूमिका तुमाने यांनी मांडली.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान
छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाला २२ जागा द्याव्या, अशी भूमिका मांडली. त्यावर बोलताना खासदार तुमाने म्हणाले, “भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांना २२ जागा दिल्या, तर मग भाजपवाल्यांनी विचार करावा. पण, जेवढ्या जागा आम्हाला तेवढ्या जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देणं शक्य नाही. गेल्यावेळी आम्ही १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी ४ जागा जिंकली होती. भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे ज्या जागा ज्यांनी जिंकल्या, त्या जागा त्यांना मिळतील. त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील”, तुमानेंनी सांगितलं.
हेही वाचा >> रुपाली चाकणकरांना उतावीळपणा नडला, मुंबई पोलिसांनी सांगितली ‘त्या’ घटनेची सत्यता
शिंदेंच्या खासदाराने भुजबळांना सुनावलं
“आम्हाला जितक्या जागा तितक्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला, असं भुजबळ यांना बोलायला काहीच लागत नाही. मी म्हणतो की आम्हाला ४८ जागा द्या, मिळणार आहे का? बोलणं आणि प्रत्यक्ष मिळणं, यात फरक आहे. हे त्यांनाही माहीत आहे. त्यांच्याजवळ तरी उमेदवार कुठे आहेत? जे निवडून येऊ शकतील, त्यांनाच उमेदवारी मिळेल”, असा टोला तुमाने यांनी भुजबळांना लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT